यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत दिग्गज खेळाडू चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. तर भारतात देखील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी ऋतुराज गायकवाडचा जलवा पाहायला मिळाला आहे. त्याने अप्रतिम फलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दिवशी (४ नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात तामिळनाडू संघाने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाकडून सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याने अवघ्या ३० चेंडूंमध्ये ८ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने ५१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने केवळ २८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
परंतु तो महाराष्ट्र संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. महाराष्ट्र संघाला १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
"Rocket show" on Diwali morning 🎆#SyedMushtaqAliT20 #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/zRgwaafyEE
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 4, 2021
Ruturaj continues his dream form with the bat, leading Maharashtra, chasing 168 runs against Tamil Nadu and he scored fifty from 28 balls. pic.twitter.com/i3dlb6Q5Ki
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2021
ICYMI: 8⃣ fours, 1⃣ six & 5⃣1⃣ off 3⃣0⃣ balls! 👏 👏
Sit back & relive this fine half-century from @Ruutu1331 🎥 🔽 #SyedMushtaqAliT20 #TNvMAH https://t.co/8QPKiAa6NB
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 4, 2021
तामिळनाडू संघाचा जोरदार विजय
या सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडू संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विजय शंकरने सर्वाधिक ४२ तर साई सुदर्शनने ३५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर तामिळनाडू संघाला २० षटक अखेर ४ बाद १६७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ५१ तर नौशाद शेखने २२ धावांची खेळी केली. महाराष्ट्र संघाला २० षटकअखेर अवघ्या ५ बाद १५५ धावा करता आल्या. हा सामना तामिळनाडू संघाने १२ धावांनी आपल्या नावावर केला.
आयपीएल स्पर्धेत ऋतुराजचा बोलबाला
नुकतीच यूएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने अप्रतिम कामगिरी करत आयपीएल इतिहासातील चौथे जेतेपद पटकावले. चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवून ऋतुराज गायकवाडने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप देखील पटकावली होती. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक ६३५ धावा केल्या. या बाबतीत त्याने फाफ डू प्लेसिस आणि केएल राहुलसारख्या दिग्गज फलंदाजांना देखील मागे टाकले.
महत्वाच्या बातम्या-
जडेजाचा जबरदस्त झेल पाहून सामना दर्शकांनी घातली तोंडात बोटे, पण अखेर प्रयत्न ठरले विफळ!
विराटला १५७७ दिवसानंतर समजली अश्विनची ‘किंमत’, त्यानेही १४ धावांवर २ विकेट्स घेत दाखवली ताकद
हीच आहे ‘हिटमॅन’ची ताकद! रोहितचा ढासू षटकार, चेंडू जाऊन पडला थेट डगआऊटमधील विराटपाशी