देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीचे उपांत्य फेरीचे सामने अहमदाबाद येथे सुरू आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र संघाची गाठ आसामशी पडली. महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने या सामन्यातही तुफानी दीडशतक साजरे करत आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही द्विशतकी खेळी केली होती.
उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केलेल्या ऋतुराजने आपला तोच फॉर्म कायम राखला. उपांत्य फेरीच्या या सामन्यात त्याने सलामीला येत केवळ 88 चेंडूंवर शतक झळकावले. त्याने 126 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 168 धावा तडकावल्या. हे त्याच्या मागील नऊ विजय हजारे ट्रॉफी सामन्यातील सातवे शतक आहे. या शतकांनंतर ऋतुराज गायकवाड हा जागतिक क्रिकेटमधील पहिला असा फलंदाज बनला आहे. ज्याची सरासरी ही लिस्ट ए क्रिकेटमध्ये 60 पेक्षा अधिक आहे.
ऋतुराजने आतापर्यंतच्या आपल्या लिस्ट ए कारकिर्दीत 71 सामने खेळताना 60.40 च्या अविश्वसनीय सरासरीने 3926 धावा बनविल्या आहेत. यामध्ये 14 शतकांचा समावेश आहे. केवळ या हंगामाचा विचार केल्यास ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये 4 सामने खेळताना 552 धावा चोपल्या आहेत.
उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यातही ऋतुराजने अशाच प्रकारची खेळी केली होती. त्या सामन्यात ऋतुराजने 138.36 च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या होत्या. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकांराचा समावेश होता. त्याने डावाच्या 49 व्या षटकात शिवा सिंग याला सात षटकार मारत विश्वविक्रमही रचला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एका षटकात सात षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज बनलेला.
(Ruturaj Gaikwad Smash Century In Vijay Hazare Trophy Semi Final )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनला वगळल्याने शशी थरूर यांची संघ व्यवस्थापनावर आगपाखड; लक्ष्मण-पंतला धरले धारेवर
खळबळजनक! पाकिस्तानात पोहोचलेल्या तब्बल 14 इंग्लिश खेळाडूची बिघडली तब्येत; पहिली कसोटी संकटात