मुंबई । मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला, चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ऋतुराजच्या रविवारपासून दोन टेस्ट होतील, त्यामुळे तो इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी सीएसके संघातील 13 सदस्य कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यात ऋतुराज आणि दीपक चाहर अशा दोन खेळाडूंचा समावेश आहे. या इतर 11 जणांव्यतिरिक्त, चाहरने या विषाणूपासून मुक्त झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू केले आहे. यापूर्वी त्याच्या दोन चाचण्या झाल्या. ज्यामध्ये त्याचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला.
ऋतुराज गायकवाडची होणार आणखी दोन कोरोना टेस्ट
सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, ‘ऋतुराजच्या, नियमांनुसार आज आणि उद्या आणखी दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. जर तो निगेटिव्ह आढळला तर तो टीम हॉटेलमधील जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणाशी जोडला जाईल. इतर कर्मचारी सदस्य निगेटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि ते आता चांगले आहेत. ते संघाच्या जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात परत आले आहेत.’
ऋतुराज आणि चाहर भारत ‘अ’ संघात नियमित खेळतात. ऋतुराज याला सीएसके संघात सुरेश रैनाची जागा घेणारा दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु रविवारी आणि सोमवारी त्यांची कोरोना चाचणी होणार असल्याने सीएसकेला थोडेस थांबावे लागणार आहे. रैना वैयक्तिक कारणास्तव आगामी आयपीएल हंगामातून माघार घेतो.
फिटनेस टेस्ट द्यावी लागणार
कोरोना व्हायरस टेस्टमध्ये निगेटिव्ह आल्यानंतर ऋतराजला हृदय व फुफ्फुसांच्या चाचण्या कराव्या लागतील. ज्यामुळे त्याची तंदुरुस्ती तपासली जाईल. ऋतुराज एका आठवड्यानंतर उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. कदाचित तो आणखी काही सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.