भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळवला जाईल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे आणि क्लीन स्वीप करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे या दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी, तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जाऊ शकतो.
मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने निश्चितपणे झिम्बाब्वेला १६१ धावांत गुंडाळले पण सोपे लक्ष्य गाठताना त्यांनी ५ विकेट गमावल्या. शिखर धवनने या सामन्यात ३३ धावा केल्या मात्र तिसऱ्या वनडेत त्याला वगळले जाऊ शकते. वास्तविक ऋतुराज गायकवाडला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत एकुण १६० खेळाडू सहभागी
पाकिस्तानी कर्णधाराचा आणखी एक विक्रम! नेदरलँडविरुद्ध एकेरी खिंड लढवत रचला इतिहास