ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करतोय. यंदाच्या आयपीएलमध्ये तो जबरदस्त फार्मात आहे. ऋतुराज आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याच्या डोक्यावर सध्या ‘ऑरेंज कॅप’ आहे. मात्र, स्पर्धेदरम्यान आता तो एका वेगळ्याच रुपात दिसला. ऋतुराजचा पत्नी उत्कर्षा पवारसोबत एक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये तो पत्नीसोबत बर्फाळ दऱ्यांचा आनंद घेताना दिसतोय.
चेन्नई सुपर किंग्जची टीम त्यांचा पुढील सामना खेळण्यासाठी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पोहोचली आहे. येथे चेन्नईचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. हा सामना रविवार, ५ मे रोजी होईल. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ धर्मशाला येथे पोहोचला, जिथे खेळाडूंनी तेथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला.
यावेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड पत्नी उत्कर्षा पवारसोबत दिसला. हे दोघे पती-पत्नी ज्या ठिकाणी बसले होते, तिथून मागे बर्फाचे डोंगर दिसत होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये ऋतुराजनं पर्वत आणि बर्फाचे इमोजी वापरले आहेत. मात्र, चेन्नईच्या कर्णधारानं या पोस्टवर कमेंट करण्याचा पर्याय बंद ठेवला आहे. तुम्ही ही पोस्ट येथे पाहू शकता.
View this post on Instagram
चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यापैकी संघानं 5 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईनं आपला शेवटचा सामना पंजाब किंग्जविरुद्धही खेळला होता, ज्यामध्ये त्यांना 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांचा सामना पंजाबशी होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जची या हंगामातील कामगिरी जरी संमिश्र असली तरी, कर्णधार ऋतुराज गायकवाड तुफान फॉर्मात आहे. त्यानं 10 सामन्यांत फलंदाजी करताना 63.62 च्या सरासरीनं आणि 146.69 च्या स्ट्राईक रेटनं 509 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 4 अर्धशतकं निघाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचे ५ मोठे खेळाडू, ज्यांना या हंगामात एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही
टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्मात परतले, तर भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप!
कोलकाताविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून का खेळला रोहित शर्मा? कारण आलं समोर