इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातही भारताचा कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. विराट गेल्या २ वर्षापासून शतकाही प्रतिक्षा करत आहे. त्यामुळे सध्या त्याच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा होत आहे. त्यातच १२ ऑगस्ट रोजी रियान परागने केलेले एक ट्विट प्रचंड व्हायरल झालं, ज्यामुळे तो अडचणीत सापडला आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान परागने ट्विट केले होते की “बटण लावून आणि कॉलर खाली करा…विराट कोहलीमध्ये पूर्वीसारखे वाईब्स नाही राहिले.” यानंतर चाहत्यांनी परागला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ला देण्यास सुरुवात केली.
खरं तर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात तो ४२ धावा करुन बाद झाला. त्यामुळे त्याची ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतिक्षा कायम राहिली. याचदरम्यान परागने ट्विट केल्याने तो प्रचंड ट्रोल झाला. ट्वीटनंतर चाहते परागवर प्रचंड भडकले आहेत. अनेकांनी परागला स्वत:च्या कारकिर्दीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
पराग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. आयपीएलमध्ये तो बऱ्याचदा त्याचा विविध सेलिब्रेशन स्टाईलमुळे चर्चेत असतो. यावरुनही चाहत्यांनी परागला फटकारले आहे.
Ha bhai terse hi to sikhega ab
Apni game par dhyan de bhai
Kuch aacha nhi kiya hai ipl mai tune 😂😂😂😂😂— Gagan Kapoor (@GaganKa45446001) August 14, 2021
First Make Your Space In India Test Team And Make At Least 1 Century Then Talk About Virat Kohli Vaiya.Okkk …. Understood 😳🙄😁@paragRiyan
— Bikash Yadav (@BikashY72405042) August 14, 2021
Riyan parag first look yourself in the mirror then open ur mouth against our king kohli ❤️
— @imsaiivisrk (@Saiveee1) August 12, 2021
I don't believe in jinxes but then I saw ur tweet now I am scared
— Rohan (@og__rohan) August 12, 2021
https://twitter.com/shubhrmfc/status/1425852137834045444
Its a matter of 1 hundred. Once he gets it he will be fluent. Just need to break the shackles!
— Shrey Sharma (@ssmusiclover89) August 12, 2021
Riyan parag Sirf IPl me selfi lene se mahan nahi bante uske liye , cricket ki paribhasha samjani hogi jo tum me kafi km he .
— Pawan Kumar Vishwakarma (@PawanKu31379886) August 14, 2021
Dear @ParagRiyan at first see your face in mirror, then post comment on King Kohli…! #Form is temporary,achievement is permanent, mind it
— Ashim Borah (@ashim_borah88) August 14, 2021
Okay bro..he might not be the same just for one or two matches , but you need to stop doing the dance steps for just a single boundary in IPL😂😂😂…do the best in IPL and get into Indian team than start saying the same thing directly to kohli bhai 😂😂…
— Vishal (@wankanda_4ever) August 13, 2021
पराग देशांतर्गत क्रिकेट आसामकडून खेळतो. त्याने १३ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६५९ धावा केल्या आहेत आणि १४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अ दर्जाचे २४ सामने खेळले असून ५४१ धावा केल्या आहेत आणि २२ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ४८ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८९५ धावा केल्या आहेत आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: बीसीसीआयचा लोगो दाखवत लाॅर्ड्स मैदानावर अज्ञात चाहत्याचा गोंधळ, खेळाडूंचे विनापैशाचे मनोरंजन
भारताचा विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद खेळणार अमेरिकेतील ‘या’ स्पर्धेत; संघासह करारही झाला
आजपर्यंत इंग्लंडच्या कोणत्याच कर्णधाराने केला नव्हता तो ‘मोठा’ पराक्रम रुटने करुन दाखवलाच