---Advertisement---

आजपर्यंत इंग्लंडच्या कोणत्याच कर्णधाराने केला नव्हता तो ‘मोठा’ पराक्रम रुटने करुन दाखवलाच

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 10:49 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत संघांचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत धावसंख्या ३६४ धावांवर पोहोचवली. त्यानंतर इंग्लंडकडून फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दीड शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

रूट या मालिकेतील दुसरे शतक ठोकत एका वर्षात सर्वाधिक शतकं मारणारा इंग्लिश कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून जो रूटने यावर्षी ५ शतके लगावले आहेत. याआधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहम गूच यांच्या नावे होता. गुच यांनी ११९० साली इंग्लंडचा कर्णधार असताना एका वर्षात ४ शतकं ठोकली होती. त्यानंतर १९९४ मध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल एथरटनने ४ शतकं लगावली होती. तसेच अँड्रु स्ट्रॉसने २००९ साली एका वर्षात ४ शतक मारली होती.

तसेच कसोटीत एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. त्याने २००६ साली ७ शतकं केली होती. तसेच दुसऱ्या क्रमांकावरही पाँटिंग आहे. त्याने २००५ साली ६ शतकं केली होती. दुसऱ्या क्रमांकावर त्याच्यासह ग्रॅमी स्मिथ आणि स्टिव्ह स्मिथही आहेत. ग्रॅमी स्मिथने २००८ साली आणि स्टिव्ह स्मिथने २०१७ साली ६ शतकं केली होती.

कर्णधार म्हणून एका वर्षात ५ शतकं आत्तापर्यंत डॉन ब्रॅडमन(१९४८), ऍलेन बॉर्डर(१९८६), ब्रायन लारा(२००३), माहेला जयवर्धने(२००७), मायकल क्लार्क(२०१२), विराट कोहली (२०१७ आणि २०१८) आणि जो रुटने (२०२१) केली आहेत.

त्याचबरोबर रूट इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. रूट इंग्लंडकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. रूटने १०७ कसोटी सामन्यांमध्ये जवळपास ९००० धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक जास्त धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुकच्या नावे आहे. कुकने एकूण १६१ कसोटी सामन्यांमध्ये तब्बल १२,४७२ धावा केल्या आहे. रूटचे असेच प्रदर्शन राहिल्यास तो लवकरच कुकला सर्वाधिक जास्त धावा करण्याच्या बाबतीत मागे टाकू शकतो.

दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी चहाच्या विश्रांती पर्यंत इंग्लंड संघाची स्थिती ३१४ वर ५ विकेट अशी होती. ज्यात रूट १३२ धावांवर खेळत होता. त्याचबरोबर भारताकडून गोलंदाजी करत मोहम्मद सिराजला ३ विकेट मिळाल्या, तर मोहम्मद शमीला १ आणि ईशांत शर्माला १ विकेट मिळाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –
भारताचा विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद खेळणार अमेरिकेतील ‘या’ स्पर्धेत; संघासह करारही झाला
इरफान पठाणची प्रशिक्षक होण्याची तयारी पूर्ण; राहुल द्रविडचे मार्गदर्शनाबद्दल मानले आभार
विराटच्या शतकाच्या दुष्काळावरून सेहवागने घेतली मजा, केले ‘असे’ ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---