गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेला भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्याने नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि बीसीसीआय आयोजित ८ दिवसांचा लेव्हल २ हायब्रिड कोचेस कोर्स पूर्ण केला आहे.
माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने या कोर्स दरम्यानचा फोटो शेअर केले आहे. ज्यात युसूफ पठाण, नमन ओझा, अभिषेक नय्यर, अशोक डिंडा, व्हीआरव्ही सिंह आणि परवेज रसूल यांच्यासह अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू त्याच्यासोबत दिसत आहेत.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आता लवकरच एखाद्या संघाचा प्रशिक्षक म्हणून दिसू शकतो. कोचिंग कोर्स ८ दिवसांचा होता जिथे अनेक मोठे खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल इरफानने एनसीए प्रमुख राहुल द्रविड आणि इतर सदस्यांचे आभार मानले. भारतीय क्रिकेटमध्ये एनसीएच्या योगदानाबद्दलही त्यानी कौतुक केले.
प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केल्याबद्दल एनसीए प्रमुख राहुल द्रविडसह उर्वरित सदस्यांचे आभार मानताना पठाण म्हणाला की, “मी एनसीए बीसीसीआयचा लेव्हल २ हायब्रिड कोर्स पूर्ण केल्याबद्दल आनंदी आहे.”
पठाण याने लिहिले, “मी माझ्या चाहत्यांना हे सांगण्यास उत्सुक आहे की मी नुकताच एनसीए आणि बीसीसीआयद्वारे आयोजित लेव्हल २ हायब्रिड कोर्स पूर्ण केला आहे. मला आणि सर्व खेळाडूंना आठ दिवसांचे अद्भुत शिक्षण दिल्याबद्दल मी राहुल भाई आणि सदस्यांचे आभार मानू इच्छितो.”
इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने मागीलवर्षी ४ जानेवारीला सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. पठाणने २९ कसोटीत एक शतक आणि सहा अर्धशतकांच्या मदतीने ११०५ धावा केल्या आणि १०० विकेट्स घेतल्या. १२० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने पाच अर्धशतकांच्या मदतीने १५४४ धावा केल्या आणि १७३ विकेट्स घेतल्या. २४ आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याने १७२ धावा केल्या आणि २८ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या शतकाच्या दुष्काळावरून सेहवागने घेतली मजा, केले ‘असे’ ट्विट
जो रूट ऑन फायर! लॉर्ड्सवर शतक ठोकत ‘असा’ पराक्रम करणारा बनला जगातील सहावा कर्णधार