---Advertisement---

जो रूट ऑन फायर! लॉर्ड्सवर शतक ठोकत ‘असा’ पराक्रम करणारा बनला जगातील सहावा कर्णधार

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 9:03 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या डावात शतकी खेळी करण्याबरोबरच खास विक्रमही केला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटने भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून शतकी खेळी केली. ज्यामुळे त्याने एका विक्रमाला गवसणी घातली. रूटचा लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी कर्णधार म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे. तो हा विक्रम करणारा ६ वा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम मायकल वॉन, ग्रॅहम गुच, अँड्र्यू स्ट्रॉस, लेन हटन आणि ग्रॅमी स्मिथ यांनाच करता आला होता.

लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रम मायकल वॉनच्या नावे आहे. त्याने लॉर्ड्सच्या मैदानात एकूण ४ शतके कर्णधार म्हणून केली आहेत. त्यानंतर ३ शतकांतसह ग्रॅहम गूच आणि अँड्र्यू स्ट्रॉस संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तसेच रूटचे लॉर्ड्सवरील हे कर्णधार म्हणून दुसरे शतक आहे. या शतकातसह तो लीन हटन आणि ग्रॅमी स्मिथ यांच्यासह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

दरम्यान, गुरुवार (१२ ऑगस्ट) पासून इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. यामध्ये भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी शतकीय भागीदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताचे सलामी फलंदाज केएल राहुलच्या १२९ धावा आणि रोहित शर्माच्या ८३ धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावांचा डोंगर उभा केला.

याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ९८ षटकांत ३१४ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शतकी खेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –
Video: लॉर्ड्सवरील प्रेक्षकांनी केएल राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क; चाहत्यांचे कृत्य पाहून विराटने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ‘या’ चुकीमुळे संघाचे मोठे नुकसान? कृणालच्या कोव्हिड चाचणीला केला उशीर
…म्हणून इशान किशनला रोहित शर्मा म्हणाला, ‘कोणी काही बोलले तर त्याला माझ्याशी बोलायला सांग’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---