पुणे। बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतसब-ज्युनियर बिलियर्ड्स गटात महाराष्ट्राच्या रयान राझमी याने विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन तास चाललेल्या अंतिम फेरीच्या लढतीत 21 वर्षाखालील गटांतील राज्यातील अव्वल बिलियर्ड्स खेळाडू मुंबईच्या रयान राझमी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सुमेर मागो याचा 627-263 असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. रयान याने आपल्या खेळीत 77 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला. रयान एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स 12वी इयत्तेत शिकत असून रेडिओ क्लब प्रशिक्षक अशोक शांदिल्या यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यावेळी रयान म्हणाला कि, यावर्षी माझे गटांतील शेवटचे वर्ष असून मी लक्षपूर्वक खेळ केला व त्यामुळे मला विजेतेपद पटकावता आले. सामन्यात मी सुरेख खेळ केला. शेवटच्या क्षणी मी चांगला खेळ केला व त्यामुळे सहज विजय मिळविता आला.
याआधीच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या रयान राझमी याने आपला बंधू शयान राझमीचा 490-261 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात सुमेर मागो याने माजी सब-ज्युनियर बिलियर्ड्स विजेता क्रिश गुरबकसानीचा 319-308 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
ज्युनियर बिलियर्ड्स(21वर्षाखालील)मुलांच्या गटात मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत झारखंडच्या जीत वासानीने तेलंगणाच्या विश्वनाथ रेड्डीचा 312-198 असा तर, कर्नाटकच्या मयंक कार्थिकने तामिळनाडूच्या वेत्रेवेलचा 226-208 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या सुमेर मागोने तामिळनाडूच्या आदेश कोठारीचा 429-232 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
सब-ज्युनियर(18वर्षाखालील) मुले:उपांत्य फेरी:
सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.क्रिश गुरबकसानी(महाराष्ट्र) 319-308;
रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.शयान राझमी(महाराष्ट्र) 490-261-;
अंतिम फेरी: रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.सुमेर मागो(महाराष्ट्र) 627-263;
ज्युनियर बिलियर्ड्स(21वर्षाखालील)मुले: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
जीत वासानी(झारखंड)वि.वि.विश्वनाथ रेड्डी(तेलंगणा) 312-198;
मयंक कार्थिक(कर्नाटक)वि.वि.वेत्रेवेल(तामिळनाडू) 226-208;
कबीर शर्मा(पश्चिम बंगाल)वि.वि.वैभव पांडे(दिल्ली)226-173;
कर्मेश पटेल(गुजरात)वि.वि.विश्वजीत मोहन(उत्तरप्रदेश) 474-282;
जोनाह मार्क अँटोनी(तामिळनाडू)वि.वि.विश्वास मार्गेरिया(हरियाणा) 239-233;
रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.ओवासिस कामरान(उत्तराखंड)584-157;
सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.आदेश कोठारी(तामिळनाडू) 429-232;
सब-ज्युनियर स्नूकर मुले: पहिली फेरी:
अमल रझाक(केरळ)वि.वि.विनोद(तामिळनाडू) 2-0(71-06, 81-11);
फेबीन मोसेस वि.वि.जतीन अगरवाल(मध्यप्रदेश) 2-0(58-17, 64-19);
अमन ठाकेर(झारखंड)वि.वि.मनोज(तामिळनाडू) 2-0(60-10, 63-20);