येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू सहभाग घेणार आहेत. तसेच ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेकरीता सर्वच संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर, एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यामुळे एका क्रिकेटपटूसाठी मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करणे नक्कीच आठवणीतला क्षण असेल. नेदरलँड संघाचा अष्टपैलू खेळाडू रेयान टेन डोईशे हा ४१ वर्षीय खेळाडू यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धेत डच संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
२००६ मध्ये केले होते पदार्पण
रेयान टेन डोईशेने २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्याने अप्रतिम खेळी करत ग्राहम गुचचे मन जिंकले होते. ज्यानंतर त्याला एसेक्स संघात सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
डोईशेची कारकीर्द
नेदरलँड संघाचा दिग्गज खेळाडू रेयान टेन डोईशेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेदरलँड संघासाठी त्याने ३३ वनडे आणि २२ टी-२० सामने खेळले आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०३ प्रथम श्रेणी, २३५ अ दर्जाचे सामने आणि आणि ३८० ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याला जवळपास २४ हजार धावा करण्यात यश आले होते. तसेच त्याने ४०० पेक्षा जास्त गडी देखील बाद केले आहेत.
चाहत्यांचे मानले आभार
रेयान टेन डोईशेने म्हटले की, “मला या क्लबसाठी (एसेक्स) खेळलेल्या प्रत्येक खेळाडूचे आभार मानायचे आहेत. अशा वातावरणात खेळून मला खूप काही शिकायला मिळालं आहे. हा एक असा संघ आहे, जिथे खेळून खेळाडूंचा विकास होत असतो.”
After 19 seasons of fantastic service to the Club, @rtendo27 has announced that he will retire at the end of the year.
Thank You Tendo 👑
Read More ⤵️⤵️⤵️
— Essex Cricket (@EssexCricket) September 11, 2021
केकेआर संघाचे केले होते प्रातिनिधित्व
रेयान टेन डोईशेने २०११ पासून ते २०१५ पर्यंत इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघांचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्याने आपल्या कारकीर्दीत २९ सामने खेळले, ज्यामधे त्याला २३.२८ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या होत्या. यासह २ गडी देखील बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ३५ वर्षीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
आयपीएलप्रेमींनो, धरा युएईची वाट!! २ वर्षांनंतर स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश, पण आहे एक अट