---Advertisement---

टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाची शक्यता, केवळ BCCI च्या मंजुरीची प्रतीक्षा

On: मंगळवार, जुलै 14, 2026 4:14 PM
---Advertisement---

येत्या काळात भारतीय वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षण मंडळात काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. सध्या संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात व्यस्त असून दरम्यान एका प्रशिक्षकाने संघ सोडण्याचा विचार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी संघ सोडण्याचा विचार केला आहे. तसे त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवलेही आहे. त्यामुळे त्यांना आता केवळ बीसीसीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. सर्व काही नीट पार पडले तर ते इंग्लंड दौऱ्यानंतर त्यांच्या पदावरून कार्यमुक्त होतील.

भारताने नुकतेच इंग्लंड दौऱ्यात टी २० मालिका खेळली, ज्यामध्ये संघाला ०-४ असे दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता वनडे मालिका सुरू असून डोशेट राजीनामा देण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, डोशेट यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल बीसीसीआयला कळवले आहे. त्यांना जर परवानगी मिळाली, तर ते लवकरच संघ सोडतील.

इंग्लंड विरुद्ध भारत वनडे मालिकेतील शेवटचा सामना १९ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. हा डोशेट यांचा भारतीय संघासोबतचा शेवटचा सामना ठरू शकतो.

डोशेट यांनी हा निर्णय कौटुंबिक कारणांमुळे घेतला आहे. त्यांची पत्नी आणि तीन मुलांसह त्यांचे कुटुंब लंडनमध्ये राहते. त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.

डोशेट मागील दोन वर्षांपासून भारतीय संघाशी जोडले गेले आहेत. या काळात संघाने अनेक सामने आणि स्पर्धा जिंकल्या आहेत, मात्र अनेक पराभवांचाही सामना करावा लागला आहे. ते संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असले तरी, त्यांनी संघाच्या क्षेत्ररक्षणावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. बीसीसीआय त्यांच्याबाबतीत काय निर्णय घेतील, हे जाणणे आता महत्त्वाचे ठरेल. (Ryan Ten Doeschate wants to move on from Team India and he already informed BCCI)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---