रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकाचे फ्रांसने विजेतेपद मिळवले.
रविवारी (१५ जुलै) बलाढ्य फ्रांसने क्रोएशियाला ४-२ अशा फरकाने पराभूत करत अंतिम समन्यात विजय मिळवला.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये १८ व्या मिनिटाला अॅंटोनी ग्रीझमॅनने मारलेल्या फ्री किकवर क्रोएशियाच्या मारिओ मेंझुकिकचा हेड लागल्याने क्रोएशियाने ओन गोल केल्यामुळे फ्रांसला १-० अशी आघाडी मिळाली.
त्यानंतर पुढच्या दहा मिनिटातच २८ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या इवान पेरीसिचने फ्रि किकवर गोल करत क्रोएशियाचे खाते उघडले.
त्यानंतर १-१ असा बरोबरीत चाललेल्या सामन्यात ३८ व्या मिनिटाल अॅंटोनी ग्रीझमॅनने केलेल्या गोलमुळे फ्रांसने २-१ अशी आघाडी घेतली.
सामन्याच्या दुसऱ्या हाफला दोन्ही संघानी आक्रमक खेळ करत सुरवात केली.
फ्रांसचे पॉल पोग्बा आणि किलियन एम्बापे यांच्या वेगवान खेळासमोर क्रोएशिया हतबल झाला.
५९ व्या मिनिटाला फ्रांसच्या पॉल पोग्बाने गोल करत फ्रान्सचा विजय जवळपास निश्चित केला.
तर ६५ व्या मिनिटाला १९ वर्षीय किलियन एम्बापेने फ्रांससाठी गोल करत फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात कमी वयात गोल करणारा ब्राझीलच्या पेले नंतर दुसरा फुटबॉलपटू ठरला.
१९५८ च्या फिफा विश्वचषकात पेले यांनी अंतिम सामन्यात दोन गोल केले होते त्यावेळी त्यांचे वय १७ होते. या सामन्यात ब्राझीलने स्विडेनला ५-२ असे पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले होते.
त्यानंतर ६९ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मांजुकिचने गोल केला. त्यानंतर मात्र सामन्याची सुत्रे आपल्या हातात ठेवत फ्रांसने क्रोएशियाला संधी दिली नाही.
निर्धारीत ९० मिनिटाच्या खेळानंतर ५ मिनिटांचा इंज्युरी वेळ देण्यात आला होता. मात्र यामध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही.
या विजयाबरोबर फ्रांसने फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. तर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहचलेल्या क्रोएशियाला उप विजेतेपदावर समाधाने मानावे लागले.
यापूर्वी फ्रांसने १९९८ साली फिफा विश्वचषकाचे प्रथम विजेतेपद मिळवले होते. तर २००६ साली फ्रान्स इटलीकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास
-फिफा विश्वचषक: रशियातील फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’