भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजीओ आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचे माजी प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात (बायोग्राफी) एस श्रीसंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “श्रीसंतने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडसोबत गैरवर्तन केले होते. त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पुढील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघात स्थान देण्यात आले नव्हते.”
यावर अप्टन यांना प्रत्युत्तर देत भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने म्हटले आहे की, “तो द्रविडचा खूप आदर करतो. त्याचे कधीही द्रविडसोबत भांडण झाले नाही. त्याला सीएसकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर काढण्याचे कारण दुसरेच होते.”
श्रीसंत म्हणाला, “मी द्रविडसारख्या उत्कृष्ट कर्णाधाराचा कधीच अपमान करु शकत नाही. मी चिडलो या गोष्टीमुळे होतो की, मला सीएसकेविरुद्धच्या ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. मला त्यांच्याविरुद्ध खेळायचे होते आणि जिंकायचेही होते. म्हणून मला का संघातून बाहेर काढले याची मी चौकशी करत होतो. परंतु अजूनही मला त्यामागचे योग्य कारण समजले नाही. डर्बन येथे खेळलेल्या शेवटच्या सामन्यात मी धोनीला त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर मला सीएसकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही.” S Shreesanth never got chance play aginst csk after bold out to ms dhoni
पुढे बोलताना श्रीसंत म्हणाला की, “संघ व्यवस्थापकांनी मला अद्यापही योग्य कारण सांगितलेले नाही. मी सीएसके किंवा धोनीचा द्वेष करतो असे नाही. फक्त त्यांचा जर्सीचा पिवळा रंग मला ऑस्ट्रेलियाची आठवण करुन देतो.”
अपटनला २०१३मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले होते आणि श्रीसंत त्याच संघाचा भाग होता. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात २०१३च्या ड्रेसिंग रुममधील काही घटनांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “श्रीसंतने राजस्थान रॉयल्सचा तत्कालिन कर्णधार द्रविडसोबत गैरवर्तन केले होते. म्हणून द्रविडने त्याला आपल्या संघातून बाहेर काढले होते आणि त्याचवर्षी श्रीसंतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे निलंबीत करण्यात आले होते.”
ट्रेंडिंग घडामोडी-
टीम इंडियाचे अनेक खेळाडू अडकले आहेत मुंबई व बेंलगोर शहरात
आफ्रिदी १६ वर्षांचा ‘जोकर’ स्वार्थापोटी करत आहे काश्मिरचं…
जर तुम्हाला त्याला पाठींबाच द्यायचा आहे तर मग वाॅटर बाॅयसारखे वागवू…