भारतीय संघाचा एकेकाळचा महत्वाचा वेगवान गोलंदाज आणि मॅच फिक्सिंगमध्ये सापडलेला एस श्रीसंत (s sreesanth) याने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावासाठी (Mega Auction) स्वतःचे नाव नोंदवले आहे. माहितीनुसार, श्रीसंतने मेगा लिलावात त्याची बेस प्राइज ५० लाख रूपये ठेवली आहे. श्रीसंत आयपीएलमध्ये शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी २०१३ मध्ये खेळला होता.
२०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर क्रिकेटमधून आजीवन बंदी घातली गेली होती. परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्याची बंदी उठवली गेली. अशात आता त्याने आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळण्यासाठी मेगा लिलावात सहभाग घेतला आहे. मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीलाला आयोजित केला जाणार आहे. यावर्षी तब्बल १२१४ खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदवले आहे, पुढे जाऊन काहीच नावांवर लिलावात प्रत्यक्ष बोली लागेल.
देशांतर्गत क्रिकेटमधून केले पुनरागमन
बंदी हटल्यानंतर श्रीसंत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने मागच्या वर्षी पार पडलेल्या २०२१ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले. या दोन्ही स्पर्धांमधील त्याचे प्रदर्शन पाहून त्याचे कौतुक देखील केले गेले. त्याने आयपीएल २०२१ च्या लिलावात देखील नाव नोंदवले होते, पण त्याला निराशा मिळाली होती. त्यावेळी त्याने बेस प्राइज ७५ लाख रूपये ठेवली होती. या हंगामात त्याची बेस प्राइस कमी असल्यामुळे फ्रेंचायझी त्याला संघात सामील करू शकतात.
श्रीसंतची कारकीर्द –
दरम्यान, त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आयपीएलमध्ये यापूर्वी ४४ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये तो सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता, त्यानंतर कोच्चि टस्कर्ससाठी खेळला. कोच्चि टस्कर्स संघ नंतर आयपीएमधून बाहेर झाला आणि श्रीसंत राजस्थान रॉयल्ससाठी खेळू लागला. भारतासाठी त्याने २७ कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये ८७ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ५३ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ७५ विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याने १० सामने खेळले आणि सात विकेट्स घेतल्या. भारताने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, या दोन्ही विश्वचषक विजेत्या भारतीय संघात श्रीसंत सहभागी होता.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२: मेगा लिलावाचा भाग नसणार हे पाच ‘टी२० स्पेशालिस्ट
कर्णधार बदलला पण रिझल्ट तोच! बाह्यदेशात वनडे मालिकेत सपाटून मार खाण्याची परंपरा कायम, पाहा यादी
भारताला धक्का! १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यातून कर्णधारासह ‘हे’ ५ खेळाडू बाहेर
व्हिडिओ पाहा –