---Advertisement---

आयपीएल लिलावासाठी निवड न झालेला श्रीसंत झाला भावूक; शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 12:03 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ चे आगमन येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. याच पार्श्वभमीवर खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात जगभरातील क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला आहे. हा लिलाव चेन्नई मध्ये १८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. प्रत्येक संघाने आपले मुख्य खेळाडू संघात ठेऊन, उर्वरित खेळाडूंना मुक्त केले आहे. अशा सर्व खेळाडूंचा समावेश या लिलावात असणार आहे. या लिलावात एकूण १११४ खेळाडूंनी नाव नोंदणी केले होते. यातून बीसीसीआयने २९२ खेळाडूंची निवड केली आहे.

अशातच २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या एस श्रीसंतनेदेखील आपले नाव आयपीएल लिलावासाठी नोंदवले होते. परंतु, बीसीसीआयने लिलावासाठी निवडलेल्या अंतिम खेळाडूंच्या यादीतून श्रीसंतचे नाव काढून टाकले आहे. यानंतर श्रीसंतने आपला सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत केला आहे.

श्रीसंतने शेअर केलेला व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
आयपीएल लिलावाच्या यादीतून नाव वगळण्यात आल्यावर एस श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो कारमध्ये बसून गाणं गाताना दिसत आहे. ते गाणं शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारलेल्या ‘ स्वदेश ‘ चित्रपटातील आहे. तो या चित्रपटातील ‘ यु ही चला चल राही ‘ या गाण्याचे बोल गुणगुणत आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याने ‘ परमेश्वराचा प्लॅन, क्रिकेट, कुटुंब आणि प्रेम’, असे लिहिले आहे.

साल २०१३ स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्याने लावण्यात आले होती बंद
साल २०१३ मध्ये गाजलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एस श्रीसंतचा ही समावेश होता. यामुळेच त्याला आयपीएलमधून आजीवन निर्बंध लावण्यात आले होते. परंतु काही वर्षांनंतर केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरचे निर्बंध कमी करुन ७ वर्षांचे केले. हे ७ वर्षे पूर्ण केल्यानंतर २०२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याने पुनरागमन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

छोटा पॅक बडा धमाका! बेस प्राईज २० लाख असलेल्या ‘या’ खेळाडूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशांचा पाऊस

चाळीशी पार करून ‘पठ्ठ्या’ उतरलाय आयपीएलच्या लिलावात, एकेकाळी खेळला होता विराटसोबत

आयपीएल लिलाव २०२१ : वाचा कोणत्या देशाचे किती खेळाडू आजमावणार नशीब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---