भारतीय संघ २०१८ वर्ष दक्षिण आफ्रिका दौऱ्याने सुरु करणार आहे. भारतीय संघाचा दौरा ५ जानेवारी २०१८ रोजी सुरु कसोटी सामन्याने सुरु होणार आहे.
परंतु दक्षिण आफ्रिका बोर्डाला हा दौरा २६ डिसेंबर अर्थात बॉक्सिंग डेला सुरु होण्याची अपेक्षा होती. परंतु बीसीसीआयने नकार दिल्यामुळे या काळात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाशी चर्चा करून ४ दिवसांची कसोटी आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला अर्थातच झिम्बाब्वे बोर्डाकडून होकार मिळाला असून आता आयसीसीसीच्या होकाराची आफ्रिका वाट पाहत आहे.
जर ह्या ४ दिवसीय कसोटी सामन्याला होकार मिळाला तर अशी कसोटी खेळणारे दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे हा पहिले देश ठरतील तर आफ्रिकेला यातील पायोनियर म्हटलं जाईल. हा सामना पोर्ट एलिझाबेथ होणार आहे. ऑकलँडमध्ये ऑक्टोबर महिन्यात आयसीसीची मीटिंग होत असून आफ्रिका याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे.
भारतीय संघ ५ जानेवारीला पहिला सामना खेळणार असून त्यातही भारतीय क्रिकेट बोर्डाने एका सराव सामन्याची मागणी केल्यामुळे ४ कसोटी सामन्यांऐवजी ही मालिका ३ कसोटी सामन्यांची होणार आहे तर एक वनडे सामना जास्त खेळवला जाणार आहे. न्यूलँड येथील कसोटीने भारताचा हा दौरा सुरु होणार आहे.
पुढील ४ ते ५ दिवसांत या मालिकेचा पूर्ण कार्यक्रम जाहीर होणार आहे.