भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघातील कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरला झाली. पहिला कसोटी सामना सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर खेळला जात आहे. भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे आणि संघाच्या सलामीवीरांनी खास विक्रमाची नोंद केली आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल कसोटी मालिकेत सहभागी नसल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal ) या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात केली असून, एका खास विक्रमाची नोंद देखील केली आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाचा इतिहास पाहिला तर, तो निराशाजनक राहिला आहेत. भारताने अद्याप दक्षिण अफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकली नाही. अशात मयंक आणि राहुल ही दक्षिण अफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारताची तिसरी सर्वोत्तम प्रदर्शन करणारी सलामी जोडी ठरली आहे.
मयंक आणि राहुल या सलामी जोडीने या सामन्यात ११७ धावांची भागीदारी केली. हे दोघे दक्षिण अफ्रिकेत कसोटी सामन्यात तिसरे सर्वोत्तम प्रदर्शन करणारी जोडी ठरले आहेत. मयंक (६०) पहिल्या डावाच्या ४१ व्या षटकात पायचीत बाद झाला आणि राहुलसोबतची त्याची भागीदारी तुटली.
दक्षिण अफ्रिकेतील कसोटी सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या सलामीवीर जोड्यांचा विचार केला तर, वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक या सलामीवीर जोडीने सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. जाफर आणि कार्तिकने २००७ साली दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊनमध्ये हे प्रदर्शन केले होते. त्यांनी या कसोटी सामन्यात १५३ धावांची भागीदारी केली होती.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या सलामीवीर जोडीचे नाव येते. गंभीर आणि सेहवागने २०१० मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यात हा पराक्रम केला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा हा कसोटी सामना सेंचुरियनमध्ये खेळला गेला होता आणि त्यांनी या सामन्यात १३७ धावांची भागीदारी खेली होती. आता या यादीत मयंक आणि केएल राहुल ही सलामी जोडी नव्याने सामील झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बॅट हातात घेण्याआधीच विराटने केला ‘महापराक्रम’! ठरला ‘या’ बाबतीत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
हिमाचल प्रदेशने रचला इतिहास! तमिळनाडूला पराभूत करत जिंकली विजय हजारे ट्रॉफी
रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करताच भडकले भारतीय चाहते; दिल्या संतप्त प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहा –