टी20 विश्वचषक 2024 मधील पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथे होणार आहे. अफगाणिस्तानने या टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी करत अनेक संघांना अस्वस्थ केले आहे. मात्र उपांत्य फेरीत विजय त्याच्यासाठी सोपा नसेल. अफगाणिस्तान संघाला दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान असणार आहे. आतापर्यंतच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तान संघाने कधीही विजय मिळवलेला नाही.
वास्तविक, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन टी20 सामने खेळले गेले आहेत. या काळात अफगाणिस्तान संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. या दोन संघांमध्ये दोन एकदिवसीय सामनेही खेळले गेले आहेत. यातही अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी20 सामना मे 2010 मध्ये झाला होता. या सामन्यात त्याला 59 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मार्च 2016 मध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानला 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर अफगाणिस्तानला यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोघांमधील पहिला वनडे जून 2019 मध्ये खेळला गेला. तो दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सने जिंकला होता. दुसरा सामना नोव्हेंबर 2023 मध्ये झाला होता ज्यामध्ये 5 गडी राखून जिंकले.
यंदाच्या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचा अत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे मागील रेकाॅर्ड दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने असले तरी प्रत्यक्षात अफगाणिस्तानचा पारड जड असल्याच दिसत आहे. राशिद खानच्या नेतृत्तवात संघाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला परभव केला आहे. त्यामुळे एडन मार्कराम कंपनी अफगाणिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
महत्तवाच्या बातम्या-
“यावेळी भारत हरणार नाही…” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केलं वक्तव्य!
हिटमॅननं रचला इतिहास, याबाबतीत धोनीला मागे टाकत ठरला पहिला भारतीय कर्णधार
ठरलं तर! एक गोष्ट जुळून आली की टीम इंडिया थेट फायनलमध्ये