बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन यू- टर्न घेत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (Bangladesh Tour of South Africa 2022) जाण्यास तयार झाला आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. त्याने अगोदर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. बोर्ड अध्यक्ष नजमुल हसन आणि शाकिब हसन यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याबद्दल माहिती दिली आहे.
काही काळापूर्वी हसन यांनी माध्यमांशी बोलताना, शाकिबने मानसिक थकव्याचे कारण सांगत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. यानंतर त्याला बोर्डाने ३० एप्रिलपर्यंत विश्रांती दिली होती.
हसन पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले होते की, “मी नजमुल हसनसोबत मागच्या काही दिवसांत खूप वेळा बोलणे केले होते. जेव्हा मी पूर्ण वर्षाचा प्लॅन करत असतो, तेव्हा तिन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. बोर्ड या गोष्टीचा निर्णय घेईल की, मला केव्हा आराम दिला जावा. मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध आहे.”
नजमुल हसन म्हणाले की, “दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी शाकिब अल हसन तिन्ही प्रकारांच्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. जर मालिकेदरम्यान त्याने एखादा सामना सोडला, तर ते स्वीकार केले जाईल. त्याला खेळायचे आहे हेच महत्त्वाचे आहे.”
“वैयक्तिक कारणांमुळे दुबईमध्ये पोहचल्यानंतर शाकिब माझ्याशी बोलताना म्हणाला की, तुमच्याशी बोलल्यानंतरच अंतिम निर्णय घेईन. त्यानंतर त्याने सांगितले की, त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे नाही. यानंतर आम्ही त्याला सुट्टी दिली. तसेच सोशल माध्यमांना देखील याबाबत सांगितले गेले. दोन दिवसांपूर्वी त्याने मला सांगितले की, त्यावेळी तो मानसिक स्थितीत थकला होता. त्याची इच्छा होण्यासाठी त्याला पूर्ण वेळ दिला गेला,” असेही पुढे बोलताना हसन म्हणाले.
शाकिबने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७४ धावा केल्या. २ टी२० सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघामधील पहिला एकदिवसीय सामना १८ मार्च आणि दूसरा सामना २० मार्च आणि तिसरा सामना २३ मार्चला खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजच्या धडाकेबाज खेळाडूला आवडते ‘भेंडी’, तर ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा आहे दीवाना
नॉटआऊट, रिव्ह्यू, रनआऊट; मयंक अगरवालच्या विकेटचा सावळा गोंधळ, पाहा व्हिडिओ
अश्विनने कपिल देव यांचा तर विक्रम मोडलाच, आता डेल स्टेनच्या ‘या’ विक्रमावरही आहे नजर