भारतीय संघाचे (team india) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या अंदाजात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक संपल्यानंतर शास्त्रींचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ संपला होता आणि त्यांनी पुन्हा या पदासाठी अर्ज केला नाही. मात्र, एक खरा क्रिकेटप्रेमी क्रिकेटपासून लांब राहू शकत नाही. आता अश्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत की, रवी शास्त्री पुन्हा एकदा समालोचकाच्या रूपात दिसू शकतात. स्टार स्पोर्ट्स इंडियाने याचे संकेत दिले आहेत.
रवी शास्त्रींनी ७ वर्ष भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी रवी शास्त्री एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जात असायचे. आता ते पुन्हा एकदा या रूपात दिसण्याची शक्यता आहे. स्टार स्पोर्ट्स इंडियाने त्यांच्या सोशल मीडियावरून या गोष्टीचे संकेत दिले आहेत. स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये रवी शास्त्री किचनमध्ये कोणत्यातरी पदार्थाची चव घेत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काहीतरी शिजत आहे.. सांगा रवी शास्त्री याठिकाणी कशासाठी आले आहेत आणि जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.’
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे की, रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्यांच्या जुन्या अंदाजात दिसतील. भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सघाला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात रवी शास्त्री समालोचकाची भूमिका पार पाडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यापूर्वी त्यांची समालोकाच्या रूपातील कारकीर्द देखील चांगली राहिली आहे. त्यांना अनेक ऐतिहासीक क्षणांवर समालोचन केले आहे. यामध्ये २००७ टी२० विश्वचषकातील विजय, युवराज सिंगने मारलेले सहा चेंडूतील सहा षटकार, तसेच एमएसधोनीने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेला शेवटचा षटकार अशा क्षणांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात त्यांनी चांगले काम केले असले तरी, यादरम्यान चाहते त्यांच्या समालोचनाची आठवण काढत असायचे. आता पुन्हा एकदा शास्त्री चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
दिग्गजाने सांगितले आयपीएलमध्ये जास्त भारतीय प्रशिक्षक नसण्याचे कारण; म्हणाला…
कशी असणार पहिल्या कसोटीत भारतीय ‘प्लेइंग इलेव्हन’? युवा जोश की अनुभवाला मिळणार प्राधान्य?
सीएसकेने ट्रायलसाठी बोलावलेला ‘हा’ खेळाडू नक्की आहे तरी कोण?