सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्याचा बुधवारी 4 था दिवस आहे.
भारतीय संघाने कालच्या १४६ धावांपासून पुढे खेळाची सुरुवात केली. मात्र दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. शार्दुल ठाकूरला कागिसो रबाडाने स्वस्तात पव्हेलियनला पाठवले.
त्यानंतर, चेतेश्वर पुजारा व केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल २३ धावा करून माघारी परतला. त्यानंतर मैदानावर आलेला भारतीय कर्णधार विराट कोहली त्याने चार चौकार मारून चांगली सुरुवात केली. परंतु, तो १८ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. पाठोपाठ पुजारा १६ व अजिंक्य रहाणे २० धावा काढून बाद झाला. आपला पहिला सामना खेळत असलेल्या मार्को जेन्सन याने तीन तर लुंगी एन्गिडीने दोन बळी आपल्या नावे केले. सध्या रिषभ पंत व रविचंद्रन अश्विन मैदानावर आहेत.
सध्या भारतीय संघाची धावफलकावर ६ बाद १३० धावा लागल्या आहेत. तर, भारताची आघाडी १६० धावांची झालीी आहे.
पंतची एकाकी झुंज
वरच्या फळीतील सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर होती. त्याने रविचंद्रन अश्विनला साथीला घेत सातव्या गड्यासाठी ३५ धावांची भर घातली. अश्विन बाद झाल्यानंतर त्याने काहीसे आक्रमक धोरण स्वीकारले. काही दमदार चौकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, रबाडाने ३४ धावांवर त्याला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. त्यानंतर उर्वरित दोन गड्यांनी ८ धावांची भर घातली. यासह भारताचा दुसरा डाव १७४ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेसाठी रबाडा व जेन्सन यांनी प्रत्येकी चार बळी मिळविले. यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सावध पवित्रा
विजयासाठी मिळालेले लक्ष पार करण्यासाठी अथवा सामना बरोबरीत सोडवण्यासाठी यजमान दक्षिण आफ्रिकेला चार सत्रांपेक्षा अधिक फलंदाजी करण्याचे आव्हान होते. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावातील आपला पहिला गडी मार्करमच्या रूपाने दुसऱ्या षटकात गमावला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी कर्णधार डीन एल्गर व पीटरसन यांनी छोटी मात्र महत्त्वाची भागीदारी रचली. त्यानंतर वॅन डर डसेन व केशव महाराज यांच्यासोबत एल्गरने भागीदारी करत भारताला बळींसाठी झगडावत ठेवले. दिवसातील अखेरच्या षटकात केशव महाराजला बाद करत बुमराहने दिवसाचा शेवट योग्य केला. दक्षिण आफ्रिकेने ९४ धावांवर चार गडी गमावले असून, त्यांना विजयासाठी २११ धावा हव्या आहेत. भारतासाठी बुमराहने दोन तर शमी व सिराजने प्रत्येकी एक बळी मिळविला.