सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये (Centurion super park) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात (south africa vs India) ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) भारतीय संघाने १४६ धावांची आघाडी घेत, सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. परंतु याच दिवशी याच मैदानावर असा काही पराक्रम झाला आहे. जो आजवर झाला नाहीये.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. ज्याचा फायदा तिसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघातील गोलंदाजांनी मिळून तब्बल १८ गडी बाद केले आहेत (18 wickets in a single day). सेंच्युरियनच्या मैदानावरचा इतिहास पाहिला तर, आतापर्यंत कसोटी सामन्यात एकाच दिवसात इतके फलंदाज बाद झाले नव्हते. या सामन्यापूर्वी २००७ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात १६ फलंदाज बाद झाले होते.
एकाच दिवसात तब्बल १८ फलंदाज परतले माघारी
तिसऱ्या दिवसाच्या (२८ डिसेंबर) सुरूवातीला भारतीय संघाचे केवळ ३ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातील गोलंदाजांनी ७ फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर देत दक्षिण आफ्रिकेच्या १० फलंदाजांना बाद करत माघारी धाडले. शेवटी भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू झाल्यानंतर मयंक अगरवाल बाद होऊन माघारी परतला. अशा प्रकारे एकाच दिवसात तब्बल १८ फलंदाज बाद होऊन माघारी परतले.(18 wickets have fallen in Centurion in a single a day)
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात १८ फलंदाज बाद होणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तेही सेंच्युरीयनच्या मैदानावर बाद होणे आणखी मोठी गोष्ट आहे. कारण हे मैदान फलंदाजीसाठी उत्तम आहे. याच मैदानावर केएल राहुलने पहिल्या डावात फलंदाजी करताना १२३ धावांची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात १४६ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
इंग्लंडचे पानिपत करणाऱ्या बोलँडला भारतीय फलंदाजांनी दाखवलेले दिवसा तारे; वाचा ‘त्या’ मालिकेविषयी
सुट्टीचा आनंद घेत शार्दुल-अश्विनने खोलली मजेदार प्रसंगांची पोतडी; पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा :