---Advertisement---

इंग्लंडचे पानिपत करणाऱ्या बोलँडला भारतीय फलंदाजांनी दाखवलेले दिवसा तारे; वाचा ‘त्या’ मालिकेविषयी

On: बुधवार, डिसेंबर 29, 2021 12:52 AM
scott-boland
---Advertisement---

ऍशेस मालिकेतील (Ashes series) तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कामगिरी करत १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या स्कॉट बोलँडने (scott Boland) अप्रतिम कामगिरी केली. त्याने ७ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. ज्यामुळे इंग्लंडचा डाव अवघ्या ६८ धावांवर संपुष्टात आला. या खेळाच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीला जोरदार सुरुवात केली आहे. त्याला ३२ वर्ष वय असताना कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. परंतु अनेकांना माहीत नसेल की, त्याने आपला पहिला वनडे सामना ५ वर्षांपूर्वीच खेळला होता.

स्कॉटने ५ वर्षांपूर्वी २०१६ मध्ये आपल्या वनडे कारकिर्दीला सुरुवात केली होती. पहिला सामना त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळला होता. परंतु, त्याला भारतीय फलंदाजांनी चांगलाच चोप दिला होता. त्याने या सामन्यात १० षटक गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने ७४ धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात देखील त्याने १० षटकात ६४ धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यात त्याने एमएस धोनीला बाद केले होते.

मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने ९ षटकात ६३ धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यात देखील त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. ही कामगिरी पाहता त्याला चौथ्या वनडे सामन्यातून बाहेर करण्यात आलेले. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. यावेळी देखील त्याने १० षटक गोलंदाजी करत ५८ धावा खर्च केल्या. या सामन्यात देखील त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता.(Scott Boland horror odi debut against india in 2016)

यासह स्कॉटला संधी मिळूनही तो संधीचा लाभ घेऊ शकत नव्हता. ४ वनडे सामन्यात त्याने ३९ षटक गोलंदाजी करत २५९ धावा खर्च केल्या होत्या. म्हणजेच त्याने २३४ चेंडू टाकून एकच गडी बाद केला होता. भारतीय संघाविरुद्ध केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला संघाबाहेर करण्याऐवजी पुढे आणखी संधी देण्यात आली होती. त्याला न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील संधी देण्यात आली. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने १४ वनडे सामन्यात १६ गडी बाद केले आहेत. त्याने ऑक्टोबर २०१६ मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. ६७ धावा देत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

महत्वाच्या बातम्या :

तिसऱ्याच दिवशी बॉक्सिंग डे कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका घातली खिशात; इंग्लंडचा डावाने पराभव

”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली

महत्वाच्या बातम्या :

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---