दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेतील (sa vs ind odi series) पहिले दोन सामने भारताने गमावले आहेत. पहिल्या दोन सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी सुमार प्रदर्शन केले. त्याचसोबत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) यानेही निराशाजनक प्रदर्शन केले. पंतने पहिल्या दोन सामन्यांमध्ये एक महत्वाचा झेल आणि एक स्टंपिंग अशा दोन महत्वाच्या संधी हातातून सोडल्या होत्या. परिणामी, भारताला पराभव पत्करावा लागला होता. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील पंतने अशीच एक मोठी चूक केली आहे.
रविवारी (२३ जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंतने दक्षिण अफ्रिकी फलंदाज रासी वॅन डर ड्यूसेन (rassie van der dussen) याचा सोपा झेल सोडला. जयंत यादवच्या गोलंदाजीवर ड्यूसेनच्या बॅटचा स्पर्श झाला होता, पण पंतने हा सोपा झेल सोडला. चेंडू बॅटवर लागण्यापूर्वीच पंत लेग स्टंपच्या दिशेने गेला होता आणि याच कारणास्तव चेंडू त्याच्या ग्लोव्हजमध्ये बसला नाही.
त्याने हा झेल सोडल्यानंतर चाहते निराश झाले आणि माजी फलंदाज गौतम गंभीरने देखील त्याच्यावर टीका केली. त्याच्या या चुकीमुळे भारतीय संघाला त्याचे मोठे नुकसान झाले. ड्यूसेनने या जीवनदानानंतर क्विंटन डी कॉकसोबत १४४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील अशाच प्रकारच्या चुका केल्या होत्या, ज्यामुळे भारतीय संघाला त्याचा फटका बसला होता.
पंतचे खराब यष्टीरक्षण
पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंतने ड्यूसेनचा झेल सोडला होता. यजवेंद्र चहलच्या चेंडूवर त्याच्याकडे झेल घेण्याची संधी होती, पण त्याने या संधीचा फायदा न घेता झेल सोडला. ड्यूसेनने या सामन्यात मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेतला आणि शतक ठोकले. पुढे सामन्यात भारतीय संघाला पराभव मिळाला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंत क्विंटन डी कॉकला सहज यष्टीचित करू शकत होता, पण त्याने ही संधी सोडली. त्यानंतर डी कॉकने या सामन्यात ७८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवून दिला. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने एकदिवसीय मालिका देखील जिंकली. यापूर्वी कसोटी मालिकेतही त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या.
उभय संघातील एकदिवसीय मालिकेत भारताला दुसऱ्या सामन्यानंतर पराभव मिळाला. पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने २-० अशी विजयी आघाडी घेतली आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. तत्पूर्वी उभय संघात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने १-२ असा पराभव पत्करला होता.
महत्वाच्या बातम्या –
संधी मिळताच चहरने करून दाखवली अशी कामगिरी, जी तीन वर्षांत करण्यास तरसलेले गोलंदाज
आयसीसीने केली वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला टी२० खेळाडूंची घोषणा; घ्या जाणून कोण आहेत मानकरी
द्रविड प्रशिक्षक म्हणून पहिल्याच परदेशी दौऱ्यात ‘नापास’, तरीही पाकिस्तानी दिग्गजाने केली पाठराखण
व्हिडिओ पाहा –