दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना रविवारी (२३ जानेवारी) खेळला गेला. शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिकेने भारताला क्लीन स्वीप देत मालिका ३-० ने नावावर केली. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नाही. एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण अफ्रिकेच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर आनंदात पोस्ट केल्या. अशात त्यांचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (Keshav Maharaj) याने केलेली एक पोस्ट भारतीय चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे.
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत जिंकेल. अशी परिस्थिती होती. पण शेवटी-शेवटी दक्षिण अफ्रिकेने सामन्यात पुनरागमन करून विजय मिळवला. केशव महाराजचे योगदान यासाठी बहुमूल्य ठरले. विराट कोहली भारतीय संघाला विजयाच्या जवळ घेऊन चालला होता, पण केशव महाराजने त्याला ६५ धावांवर बाद करून तंबूत पाठवले. विराटनंतर भारताच्या एका पाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या.
मालिकेतील विजयानंतर अफ्रिकेच्या अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आणि सर्वजण आनंदात होते. महाराजने देखील आनंदात स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून खास पोस्ट केली. पोस्टचे कॅप्शन वाचून भारतीय चाहते आनंदी झाले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘आमच्यासाठी ही एक चांगली मालिका ठरली. या संघावर यापेक्षा अधिक अभिमान वाटू शकत नाही. आम्ही खुप पुढे आलो आहोत. आता पुन्हा तयार होण्याची आणि पुढचे आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. जय श्री राम.’ भारतीय चाहते दक्षिण अफ्रिकेकडून दोन्ही मालिकेतील पराभवानंतर नक्कीच निराश आहेत, पण महाराजच्या पोस्टमध्ये ‘जय श्री राम’ लिहिलेले पाहून त्यांनाही आनंद झाला.
https://www.instagram.com/p/CZGbFIKKbEX/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, केशव महाराज दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा भाग असला, तरी तो मुळचा भारतीय वंशाचा आहे. त्याने एकदिवसीय मालिकेत स्वतःच्या संघासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले. मालिकेतील तिन्ही सामन्यात त्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. यामध्ये शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने विराट कोहलीला बाद केले. या तीन विकेट्सपैकी पहिल्या दोन त्याने शून्य धावांवर घेतल्या. तर, तिसऱ्या सामन्यात विराट मात्र ६५ धावांवर बाद झाला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन त्याच्या चेंडूचा शिकार झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानंतर आली आफ्रिदीची प्रतिक्रिया; म्हणाला,” केएल राहुलला…”
आयसीसी पुरस्कार २०२१: रूट ठरला टेस्टमध्ये बेस्ट! सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पटकावला बहुमान
व्हिडिओ पाहा –