---Advertisement---

जोहान्सबर्गमध्ये कोहलीच ‘किंग’! अशी केलीये धुवाधार कामगिरी

On: रविवार, जानेवारी 2, 2022 6:53 PM
Virat-Kohli-Batting
---Advertisement---

विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघातील दुसरा सामना ३ जानेवारीपासून (सोमवार) जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. कर्णधार विराट कोहलीचे या स्टेडियमवरील प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. अशात विराटकडून दुसऱ्या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

विराटने यापूर्वी या स्टेडियमवर दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. या दोन सामन्यात त्याने ७७.५० च्या सरासरीने ३१० धावा ठोकल्या. दोन सामन्यांतीन चार डावामध्ये विराटने तीन वेळा ५० धावांचा टप्पा पार केला. तसेच एक शतकही केले आहे.

विराट कोहलीने दक्षिण अफ्रिकेतील पहिला दौरा २०१३ मध्ये केला होता आणि यादरम्यान दमदार शतक केले होते. या दौऱ्यात कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १८१ चेंडूंचा सामना केला आणि ११९ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने १८ चौकार मारले होते. विराटने या सामन्यात त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक केलेले. सामन्याच्या दुसऱ्या डावात देखील विराट शतकाच्या जवळ होता. मात्र, अवघ्या चार धावा कमी असताना त्याने विकेट गमावली. दुसऱ्या डावात त्याने १९३ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या.

विराटने त्याचा दुसरा दक्षिण अफ्रिका दौरा २०१८ मध्ये केला होता. या दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात १०६ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात ७९ चेंडूत ४१ धावा केल्या होत्या.

जोहान्सबर्ग येथे विराटच्या नावावर आहे खास विक्रम

एवढेच नाही, तर विराट या स्टेडियमवर दुसरा सर्वाधिक कसोटी धावा करणारा विदेशी खेळाडू आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू जॉन रीड यांचे नाव आहे, ज्यांनी या स्टेडियमवर खेळलेल्या दोन कसोटी सामन्यात ३१६ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचे नाव आहे. पॉंटिंगने या स्टेडियमवर चार कसोटी सामने खेळले आणि २६३ धावा केल्या. सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांना याठिकाणी खेळलेल्या २ कसोटी सामन्यात २६२ धावा केल्या आहेत.

सोमवारी सुरु होणाऱ्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, जर विराटने ७ धावा केल्या, तर तो वॉन्डरर्स स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा विदेशी खेळाडू ठरेल.

महत्वाच्या बातम्या –

मराठीत माहिती- क्रिकेटर रमन लांबा

क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे प्रेमाच्या पिचवरही ‘लांबा’ आघाडीवरच राहिले! वाचा बेधडक ‘रॅम्बो’ची जीवनकहाणी

“माझ्या आयुष्यावरही चित्रपट यावा”; स्वतः हरभजनने व्यक्त केली इच्छा

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---