भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून विजय मिळवला. उभय संघात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली (virat kohli) दुखापतीमुळे अनुपस्थित होता. विराटच्या अनुपस्थितीत हनुमा विहारी (hanuma vihari) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते. विहारीने या सामन्यात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले, ते पाहून संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (virat kohli) यांनी त्याचे कौतुक केले.
नियमित कसोटी कर्णधार विराटच्या अनुपस्थितीत केएल राहुलने दुसऱ्या सामन्यात भारताचे नेतृत्व केले. हनुमा विहारीच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने पहिल्या डावात ५३ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकारांच्या मदतीने २० धावा करून तो बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ८४ चेंडू खेळले आणि यामध्ये सहा चौकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. एका बाजूने भारतीय संघाच्या विकेट्स पडत गेल्या, पण विहारी दुसऱ्या बाजूला टिकून खेळला. अशात जर एखाद्या फलंदाजाने त्याची साथ दिली असती, तर संघाची धावसंख्या ३०० च्या पार गेली असती.
याच कारणास्तवर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विहारीचे कौतुक केले. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत द्रविड म्हणाले, “मला असे वाटते की, हनुमा विहारीने या कसोटी सामन्यात खूप चांगले प्रदर्शन केले. दोन्ही डावात त्याचे प्रदर्शन चांगले राहिले. पहिल्या डावात तो दुर्दैवाने बाद झाला, कारण क्षेत्ररक्षकाने खूपच उत्कृष्ट झेल घेतला होता. तसेच, दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम प्रदर्शन केले, ज्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला.”
तत्पूर्वी, भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने देखील विहारीच्या खेळीचे कौतुक केले होते. समालोचन करताना गंभीर म्हणाला की, जर विहारीला पुढच्या सामन्यात संघातून बाहेर ठेवले गेले, तर हे निश्चितच दुर्भाग्यशाली असेल. गंभीरच्या मते विहारीला संघात स्थान बनवण्यासाठी अजून वाट पाहायला लावणे योग्य नाही. त्याला पुढच्या सामन्यात संघात कायम ठेवले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या –
कॅरेबियन क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्यासाठी बोर्डाने कसली कंबर! दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी
विराटच्या फिटनेसविषयी मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी दिले अपडेट; म्हणाले…
व्हिडिओ पाहा –