भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका (sa vs ind test series) खेळली जात आहे. उभय संघातील दुसरा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले आहे, तर फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) सामन्याच्या दुसऱ्या डावात स्लेजिंगचा शिकार झाल्याचे दिसले आणि पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला.
रिषभ पंत मागच्या बऱ्याच दिवसांपासून एकही मोठी खेळी करू शकलेला नाही आणि बुधवारी (०५ जानेवारी) पुन्हा एकदा त्याने चाहत्यांची निराशा केली. परंतु त्याने ज्या पद्धतीने स्वतःची विकेट गमावली, ते पाहून चाहत्यांना अधिक वाईट वाटत आहे. विकेट गमावण्यापूर्वी त्याने दक्षिण अफ्रिकेच्या वॉन डर डुसेन याच्यासोबत वाद घातला होता.
रिषभ पंत फलंदाजीला मैदानात येण्यापूर्वी भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या रूपात दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. अशात संघाला पंतकडून मोठ्या खेळीची गरज होती आणि चाहत्यांनाही तशी अपेक्षा होती. परंतु मैदानावर आल्यानंतर काही वेळातच वॅन डार डुसेनसोबत त्याचा वाद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पंत सतत डुसेनला तोंड बंद ठेवायला सांगत आहे. या सर्व प्रकारणाला पंत व्यवस्थित सामोरे जाऊ शकला नाही आणि स्वतःची विकेट स्वस्तात गमावली.
https://twitter.com/im_maqbool/status/1478664900566138882?s=20
https://twitter.com/cric8countdown1/status/1478675619445493760?s=20
दक्षिण अफ्रिकी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या चेंडूवर पंतने विकेट गमावली. मैदानावरील वादानंतर पंत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण याच वेळी त्याने विकेट गमावली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात एकूण तीन चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव केली नाही. डावाच्या ३९ व्या षटकात रबाडा गोलंदाजी करत होता आणि याच षटकात पंत यष्टीपाठी झेलबाद झाला. पंतने विकेट गमावल्यानंतर समालोचन करताना दिग्गज सुनील गावसकर देखील भडकले होते. गावसकरांच्या मते अशा प्रकारच्या स्थितीत पंतला हा शॉट खेळण्याची गरज नव्हती.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: पुणेरी पलटनचा विजयाचा ‘डबल’ धमाका, गुजरात जायंट्सवर ७ अंकांनी केली मात
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण
व्हिडिओ पाहा –