---Advertisement---

विराट माध्यमांसमोर कधी येणार ? प्रशिक्षक द्रविड यांनी दिले ‘हे’ उत्तर

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 12:38 AM
coach-dravid
---Advertisement---

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयानंतर भारतीय संघात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अशात दुसऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहली स्वतः पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असेल, अशी अपेक्षा होता. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत तो पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हता. अशात द्रविडने विराटच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले.

आभासी पत्रकार परिषदेत द्रविडला विराटच्या अनुपस्थितीवर प्रश्न विचारला गेल्यानंतर त्याने उत्तर दिले की, “ ही गोष्ट मी ठरवत नाही की, पत्रकार परिषदेत कोण जाईल. ही गोष्ट मीडिया टीम ठरवते. तो लवकरच तुमच्या समोर येईल. मला याविषयी सांगितले गेले आहे की, तो केपटाउनमध्ये होणाऱ्या त्याच्या १०० व्या सामन्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वी तो तुम्हा सर्वांच्या समोर येईल आणि तुम्ही सर्वजण त्याला प्रश्न विचारू शकता.” दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना केपटाउनमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना विराटच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल.

दरम्यान, दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या ठरवल्या होत्या. या पत्रकार परिषदेनंतर विराट एकदाही माध्यमांच्या समोर आलेला नाही. सौरव गांगुलींनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी विराटला टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती. मात्र, विराटने त्यांचे ऐकले नाही आणि कर्णधारपद सोडले.

तर दुसरीकडे विराटने घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कर्णधारपद सोडताना त्याच्याशी कोणीच चर्चा केली नव्हती. तसेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवतानाही त्याला अगोदर विचारले गेल नव्हते. अशात विराट आता पुन्हा माध्यमांसमोर आल्यानंतर हा वाद अजून पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

युवा राकेशच्या मेहनतीवर पहलने फेरले पाणी; हरियाणाचा गुजरातवर रोमांचक विजय

जपून रे बाबा! झेल टिपण्याच्या नादात प्रेक्षकाने वृद्धाच्या अंगावर मारली उडी; पाहा थरारक व्हिडिओ

“टीम इंडिया जोहान्सबर्गमध्येच मालिका जिंकेल”; माजी खेळाडूने व्यक्त केला विश्वास

व्हिडिओ पाहा –

https://youtu.be/2uqjSfgKeiI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---