---Advertisement---

SA vs NZ: न्यूझीलंडचा विक्रमी स्कोअर, दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे मोठे लक्ष्य

On: बुधवार, मार्च 5, 2025 6:51 PM
---Advertisement---

South Africa vs New Zealand Semi-Final: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर (SA vs NZ)  विजयासाठी 363 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांच्या शतकांनंतर, डेथ ओव्हर्समध्ये डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी स्फोटक फलंदाजी केली. मात्र, डॅरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स दोघेही आपापल्या अर्धशतकांपासून 1-1 कमी राहिले. हा स्कोअर (362) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी संथ सुरुवात केली. न्यूझीलंडला सुरुवातीलाच विल यंगच्या रूपाने धक्का बसला, ज्याला लुंगी एनगिडीने बाद केले. यानंतर, रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना विकेटसाठी आसुसवले. रचिन रवींद्रने शानदार शतक झळकावले, त्याने 101 चेंडूत 108 धावा केल्या. या डावात त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला.

केन विल्यमसननेही आपले शतक पूर्ण केले. त्याने 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. यादरम्यान, विल्यमसनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 19 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. यानंतर डॅरिल मिशेलने शेवटच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली. ज्यामुळे संघाचा धावसंख्या 300च्या पुढे नेला. तथापि, तो त्याच्या अर्धशतकापासून 1 धाव कमी राहिला. तो 37 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला, या डावात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. अंतिम 5 षटकांत ग्लेन फिलिप्सने आफ्रिकेच्या गोलंदांजाचा धुव्वा उडवत संघाला विक्रमी धावसंख्ये पर्यंत पोहोचवले. आशाप्रकारे किवी संघाने मर्यादित 50 षटकात 362 धावा केल्या. आता दक्षिण आफ्रिकेसमोर चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 363 धावांची गरज आहे.

हेही वाचा-

SA vs NZ: रचिन रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, विक्रमी खेळीने इतिहास रचला
“विराट कोहली सर्वोत्कृष्ट महान वनडे क्रिकेटपटू” ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---