वनडे विश्वचषक 2023 मधील 32 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण आप्रिकी फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. क्विंटन डी कॉक आणि रासी वॅन डर ड्यूसेन यांनी वैयक्तिक शतकी खेळी केली. तसेच शेवटच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर याने अर्धशतक ठोकले. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी 358 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले.
उभय संघांतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. मात्र, त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पुण्याच्या खेळपट्टीवर आपले गोलंदाज चांगले प्रदर्शन करतील, अशी अपेक्षा असणाऱ्या न्यूझीलंडच्या हाती निराशा आली. 50 षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडला अवघ्या 4 विकेट्स मिळाल्या आणि दक्षिण आप्रिका संघाने 357 धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डी कॉक याने 116 चेंडूत 114 धावा केल्या, तर रासी वॅन डर ड्युसेन याने 118 चेंडूत 133 धावांची सर्वोत्तम खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर यानेही तुफान फटकेबाजी केली आणि 53 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडसाठी टीम साऊदी याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (SA vs NZ World Cup 2023 South Africa reached 350+ scores against New Zealand)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.