---Advertisement---

फिटनेसमध्ये विराटपेक्षा कमी नाही फाफ, एसए20 लीगमधील पठ्ठ्याचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल

On: सोमवार, जानेवारी 23, 2023 8:46 AM
Faf-Du-Plessis-And-Virat-Kohli
---Advertisement---

जगभरातील टी20 लीग क्रिकेटचं फॅड पाहून दक्षिण आफ्रिकेतही पहिल्यांदाच टी20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा इतर कुठली नाही, तर एसए20 लीग होय. 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील आतापर्यंत 19 सामने पार पडले आहेत. यातील 17वा सामना सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध जोबर्ग सुपर किंग्स संघात पार पडला. याच सामन्यात जोबर्ग संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज फाफ डू प्लेसिस करत आहे. विशेष म्हणजे, डू प्लेसिस हा आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही कर्णधार आहे. याच संघाकडून विराट कोहली हादेखील खेळतो. फाफ फिटनेसच्या बाबतीत विराटपेक्षा कमी नाही, याचा प्रत्यय स्पर्धेतील 17व्या सामन्यात आला.

यावेळी सनरायझर्स ईस्टर्न केप संघाच्या डावातील 19व्या षटकात फलंदाज रिलॉफ व्हॅन डर मर्व्ह याने मिड ऑफच्या वरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू हवेत गेला. यावेळी मिड ऑफवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने वेगाने धाव घेतली आणि हा झेल घेतला. त्याचा झेल पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/SA20_League/status/1616846239202516992?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1616846239202516992%7Ctwgr%5E163cd3259cc107e12f9148b4d6720d4cf804b219%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-sa20-faf-du-plessis-took-incredible-catch-in-south-africa-t20-league-watch-video-5262015.html

जोबर्ग संघाचा सहज विजय
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्स (Joburg Super Kings) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, सनरायझर्स ईस्टर्न केप (Sunrisers Eastern Cape) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी सनरायझर्स संघाचा संपूर्ण डाव 18.4 षटकात 127 धावांवर संपुष्टात आला. सनरायझर्स संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान ऍडम रॉशिंग्टन याला मिळाला. सलामीला फलंदाजी करताना त्याने 31 चेंडूत 40 धावा कुटल्या. यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.

यावेळी जोबर्ग संघाकडून गोलंदाजी करताना गेराल्ड कोट्झी आणि ऍरॉन फंगिसो यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच, रोमारियो शेफर्ड याला एक विकेट घेण्यात यश आले.

सनरायझर्सच्या 128 धावांचे आव्हान जोबर्ग संघाने 19.4 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, संघाला 2 धावांनी विजय मिळवून दिला. जोबर्गकडून ल्यूस डू प्लोय याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 47 धावांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 38 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या.

जोबर्ग सुपर किंग्स संघाने 6 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवत 12 गुणांसह गुणतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. (sa20 cricketer faf du plessis took incredible catch in south africa t20 league see video here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवख्या रवांडाचा आणखी एक उलटफेर! विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचाही उडविला धुव्वा
महिला U19 विश्वचषकातही टीम इंडियाने वाजवले श्रीलंकेचे बारा! दणदणीत विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---