पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सईद अजमल याने नुकतेच एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एका प्रसिद्ध पाकिस्तानी शो वर बोलताना त्याने जी काही विधाने केली व खुलासे केले त्यामुळे क्रिकेटजगतात मोठी खळबळ माजली आहे. अजमल याने या शोमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर एक मोठा आरोप लावला असून, त्यामुळे पीसीबीची नाचक्की होतेय.
पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंड येथे झालेला 2009 टी20 विश्वचषक आपल्या नावे केला होता. अंतिम सामन्यात त्यांनी श्रीलंकेला पराभूत केलेले. पाकिस्तानच्या या विजयाचा शिल्पकार अजमल हा ठरलेला. या विजयानंतर पीसीबीने पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले. मात्र, हे पैसे आपल्याला मिळालेच नाहीत असा आरोप त्याने केला.
तो म्हणाला,
“टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर आम्हाला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली. काही दिवसातच आम्हाला याचे चेक प्राप्त झाले. मात्र, बँकमध्ये हे चेक बाउन्स झाले. ते पैसे मला अजूनही मिळाले नाहीत. गिलानी साहेब तेव्हा तिथे होते. मात्र, तेदेखील याबाबतीत काही करू शकले नाहीत.”
याच मुलाखतीत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीमध्ये शक्तिशाली असते तर, आपल्यावर प्रतिबंध लागला नसता, असे म्हटले. अजमल याच्यावर संशयास्पद गोलंदाजी शैलीबद्दल 2014 मध्ये प्रतिबंध लावण्यात आला होता. तत्पूर्वी त्याने सात वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले. याच मुलाखतीत त्याने हरभजन सिंग, मुरलीधरण, अश्विन व कर्टली ऍम्ब्रोज हे सर्वजण फेकी गोलंदाजी करायचे असे म्हटले.
(Saaed Ajmal Said PCB Not Give Our 25 Lakh Rupees After 2009 T20 World Cup)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीवरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड! अखेरच्या दिवशी विजय 6 बळी दूर
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात