भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा खराब फॉर्म सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विराट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे. त्याला गेल्या ३ वर्षांत क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेले नाही. येत्या २-३ महिन्यात टी२० विश्वचषक २०२२ येत असल्याने विराटचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशात माजी भारतीय यष्टीरक्षर आणि राष्ट्रीय निवडकर्ते सबा करीन यांनी विराटबद्दल महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना विराटच्या टी२० विश्वचषक (T20 World Cup) संघातील स्थानाचे महत्त्व माहित आहे. तो खराब फॉर्ममधून जात असला तरीही कर्णधार आणि प्रशिक्षकाने मिळून त्याला यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे, असे सबा करीम यांचे म्हणणे आहे.
स्पोर्ट्स १८च्या एका कार्यक्रमात बोलताना सबा करीम (Saba Karim) म्हणाले की, “मला वाटते की, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला जाणून घ्यावे लागेल की, विराट टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण आहे की नाही. एकदा जर निवडकर्त्यांनी सुनिश्चित केले की, संघ व्यवस्थापनला विराट टी२० विश्वचषक संघाच्या यशासाठी महत्त्वाचा आहे, तर एक प्रशिक्षक म्हणून मी त्याला पुन्हा जुन्या रंगात आणण्यासाठी एक चार्ट तयार केला असता.”
“हीच योग्य वेळ आहे, जेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधाराने मिळून विराटशी बोलले पाहिजे आणि त्याला खराब फॉर्ममधून बाहेर काढले पाहिजे. मी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी विराटवर थोपणार नाही. जसे की, त्याला झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळायचीच आहे, अन्यथा त्याला टी२० विश्वचषकासाठी निवडले जाणार नाही, वगैरे. मला वाटते की, जेव्हा तुम्ही सुनिश्चित करता की, एखादा खेळाडू संघाच्या यशासाठी खरोखरच खूप महत्त्वाचा आहे, तेव्हा तुम्ही स्वत:हून त्याच्याजवळ गेले पाहिजे. त्याला म्हटले पाहिजे की, ठीक आहे. तुला चांगला फॉर्मात परतायचे आहे ना, मग झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत तुला खेळायचे आहे का की मोठा ब्रेक घ्यायचा आहे किंवा आशिया चषकातून टी२० संघात पुनरागमन करायचे आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकाच वर्षात रवी शास्त्रींनी पाहिजे आयपीएलचा ‘डबल डोस’; म्हणाले, ‘१२ संघ होतील सहभागी!’
वनडे शतक करण्यापासून थोडक्यात चुकला गिल, तर चर्चा रंगतीये आरसीबीची
जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…