भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची सुरू आहे. संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू असलेला बुमराह सातत्याने संघाबाहेर आहे. दुखापतींनी त्याला ग्रासले असून, तो पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, यामध्ये त्याला सातत्याने अपयश येताना दिसतेय. त्याच्या याच अनुपस्थितीमूळे आता भारताच्या माजी क्रिकेटपटूने आता बुमराहच्या पुढे पाहावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार होता. मात्र, अखेरच्या वेळी तो खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तसेच समोर येत असलेल्या माहितीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना देखील उपलब्ध नसेल. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू व माजी निवड समिती सदस्य सबा करीम यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले,
“भारतीय संघाला आता बुमराहच्या पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला वेगवान गोलंदाजी विभाग असा बनवावा लागेल, ज्यामध्ये बुमराहची अनुपस्थिती असली तरी, इतर गोलंदाज सामना जिंकून देऊ शकतील. बुमराह असणे संघासाठी बोनसच ठरेल.”
जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहेत. पाठिच्या दुखापतीमुळे बुमराह मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. सप्टेंबर 2022 आधीही बुमराह वारंवार संघातून बाहेर राहिला होता. अशात चाहते त्याला पुन्हा खेळण्यासाठी भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दुखापतीमुळे बुमराह मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषक व आयसीसी टी20 विश्वचषकात देखील खेळू शकला नव्हता. सध्या तो बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपली तंदुरुस्ती सिद्ध करत आहे.
(Saba Karim Said Now Time To See Ahead Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल
राहुल द्रविडने सोडली टीम इंडिया! तब्येतीच्या समस्येमुळे एकटाच बंगळुरूला रवाना, तिसऱ्या वनडेसाठी…