---Advertisement---

उमरान मलिकच्या जडणघडणीत इरफान पठाणचा मोलाचा वाटा, त्याला ‘ही’ जबाबदारी द्या, माजी निवडकर्त्याचे मोठे विधान

On: मंगळवार, मे 24, 2022 6:16 PM
Irfan-Umran
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला ७ जूनपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर क्रिकेट विश्लेषकांकडून अनेक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र, बहुतांश जणांनी उमरान मलिकला (Umran Malik) संधी दिल्यामुळे बीसीसीआयचे कौतुक केले. तसेच, सोबतच उमरानसारख्या खेळाडूची पारख करणाऱ्या इरफान पठाण (Irfan Pathan) याचे कौतुक होत आहे. अशातच भारतीय संघाचे माजी निवडकर्ते साबा करीम (Saba karim) यांनी इरफान पठाण बाबत विशेष वक्तव्य केले आहे.

साबा करीम (Saba Karim) यांनी ट्वीट करत इरफान पठाण (Irfan Pathan) याचे कौतुक केले आहे. इरफान पठाणचे कौतुक करत असताना ते म्हणाले की, “उमरान मलिकच्या जडणघडणीत इरफान पठाणचा मोलाचा वाटा आहे. इरफानकडे प्रतिभा ओळखणारा डोळा आहे. सोबतच, बीसीसीआयने पठाणचे कौशल्य वापरावे, असे मला प्रकर्षाने वाटते. त्याला वेगवान गोलंदाजी स्काऊटची भूमिका दिली पाहिजे.”

उमरान मलिकची भारतीय संघात निवड झाल्यानंतर सोशल मीडियापासून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान उमरानच्या निवडीनंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू इरफान पठाणचीही विशेष चर्चा आहे. उमरान मलिकच्या कामगिरीचे आणि टीम इंडियात संधी मिळाल्याचे श्रेय माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला दिले जात आहे. इरफान पठाणने जम्मू-काश्मीरच्या टीमसोबत काम करताना उमरान मलिकची प्रतिभा ओळखली. त्यामुळे इरफानचे खूप कौतुक होत आहे.

दरम्यान, उमरान मलिकसह अब्दुल समदला (Abdul Samad) देखील सनरायजर्स हैदराबादच्या संघात स्थान देण्यात इरफान पठाणचे मोठे योगदान आहे. इरफानने समद आणि उमरान यांना संधी मिळावी यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण याच्यासोबत बोलणी केली होती. त्यानंतर लक्ष्मणने दोघांचे कलागुण पारखत त्यांना हैदराबादच्या संघात स्थान दिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या बाबर आझमवर आयपीएलमध्ये ‘या’ टीमने लावले असते कोट्यवधी, अख्तरचा दावा

GTvsRR। बटलर ते मिलर, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा, गाजवू शकतात पहिला क्वालिफायर सामना

‘भारतीय स्पीडगन’ उमरानचे टीम इंडियात निवड झाल्याबद्दल इरफान पठाणबरोबर खास सेलिब्रेशन, Video व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---