---Advertisement---

मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने विजेता ठरवण्यासाठी बाउंड्री नियमाऐवजी सुचवला हा पर्याय

---Advertisement---

रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेला हा अंतिम सामना 50-50 षटकांनंतर बरोबरीत सुटला. यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली होती.

पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली. त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा या सामन्यात जास्त बाऊंड्री मारल्या असल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते. मात्र या बाऊंड्रीच्या नियमावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच त्याऐवजी दोन्ही संघांना विभागून विजेता घोषित करण्याचाही पर्याय अनेकांनी सुचवला होता.

पण भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने या बाऊंड्री नियमाऐवजी दुसरी सुपर ओव्हर घेण्याचा पर्याय सुचवला आहे.

याबद्दल मास्टर ब्सास्टर सचिन 100mb ऍपवर बोलत होता. तो म्हणाला, ‘मला वाटते विजेता ठरवण्यासाठी तिथे दोन्ही संघांनी किती बाऊंड्री मारल्या आहेत, हे लक्षात घेण्याऐवजी आणखी एक सुपर ओव्हर व्हायला पाहिजे होती.’

‘फक्त विश्वचषकाचा अंतिम सामनाच नाही तर प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. जसे फुटबॉलमध्ये जेव्हा सामना एक्ट्रा टाईममध्ये जातो, तेव्हा सामन्यात आधी काय झाले आहे, त्याने काही फरक पडत नाही.’

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.

तसेच सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 धावाच केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरही बरोबरीतच सुटली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९ दरम्यान झाले हे खास चार विश्वविक्रम

रवी शास्त्रींची उचलबांगडी पक्की? बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकांसाठी मागवले अर्ज

विश्वचषकातील पराभवानंतर विलियम्सन म्हणाला, सामन्यात कोणीही पराभूत झाले नाही

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment