सचिनच्या खेळविषयी सर्वांना पूर्णकल्पना आहे, की तो किती उत्तम खेळाडू आहे याची , पण यावर त्याची दुसरी बाजू जास्त माहीत नाही. तो माणूस म्हणून कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतीलच. क्रिकेटचा देव मानला जाणारा, सचिन खरचं खूप मोठा माणूस आहे.
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर सचिनने २०१२ ला राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर सचिन म्हणाला होता की ,” माझ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत मला क्रिकेटने खूप काही दिले आहे आणि आता मला क्रिकेटसाठी काही करण्याची संधी मिळाली आहे आहे. आज चांगल्या पदावर बसलो आहे त्याचा पुरेपूर उपयोग हा करून फक्त क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांना सुद्धा प्राधान्य देईल. त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी मी तत्पर असेल. इतर खेळांना देखील पुरेपूर मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल.,” “भारतात अनेक प्रश्न आहेत , अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी खासदार म्हणून निवडून आलेले माझे सहकारी, प्रशासक मंडळी , मीडिया आणि जनता यांनी मिळुन एकत्र काम केले तर यावर नक्कीच तोडगा निघून देशात खूप मोठा बदल घडू शकतो” असा विश्वास त्याने त्या वेळी त्या वेळी दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘खासदार ग्राम विकास योजना ‘ या योजने अंतर्गत प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन तेथे विकास घडवून आणायचा संकल्पनेतून सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील “नेल्लोर” हे गाव दत्तक घेऊन या गावाचा पुर्णतः कायापालट केला. जिथे विजेचे काही चिन्ह नव्हते शा गावात वीज आणण्याचे काम सचिनने केले . नजीकच्या काळात ग्रामविकास व पंचायत राज सचिवांना पत्र लिहून त्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील “डोंजा” हे गाव दत्तक घेण्याचे सांगितले आहे. क्रिकेटच्या निवृत्तीनंतर काय करणार विचारल्यावर सचिन सांगतो, “आजही देशात काही गावामध्ये वीज नाही, सूर्यास्तानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे अंधारात जाते अशा गावात सौर दिवे लावळण्याची इच्छा आहे. गावोगावी ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम आहे. सर्वाना स्वच्छ पाणी, दारूपासून मुक्ती असा काही सामाजिक प्रश्नावर काम करण्यासाठी उत्सुक आहे ” .
सचिन आधीपासूनच सामाजिक कार्यात सहभागी होता . “सोशल कॉज” वर सचिन अनेक प्रकारे काम करत असतो . सचिनच्या सासूबाई तर्फे चालवल्या जाणाऱ्या “अपनालय” या स्वयंसेवी संस्था मार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक व इतर मदत करत सचिन करतो .याचा कोठेही गाजावाजा न करता हे काम सचिन गेले अनेक वर्षे करत आहे . याबाबत त्याने नेहमीच गोपनीयता बाळगली आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक व अबोल फौंडेशन यांनी राबविलेल्या “सोफोश”( सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल ) च्या कार्यक्रमात मदतीसाठी सचिनने २०१५ साली पुण्यात एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रम दरम्यान एक कोटी 52 लाख,50 हजार रुपयांचा निधी जमा केला होता . हा निधी या “सोफोश” ला देण्यात आला. या व्यतिरिक्त “मेक अ विश फौंडेशन” मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्याचे काम करते. या मुलांच्या आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसून आणण्यासाठी सचिन नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो वेळेत वेळ काढून त्यांना भेटायला जातो . जसे सचिनला समाजातील गरजू लोकांची आपुलकी आहे तशी ती भारताच्या सैनिकांचा खूप आदर करतो , त्यांच्या बाबतीत बोलताना तो म्हणतो,” खरे हिरो हे देशाचे सैनिक आहेत आम्ही फक्त मैदानावर खेळ खेळत असतो, मनोरंजन करत असतो, आमच्यावर फक्त नीट खेळण्याची जबाबदरी असते, परंतु यांच्यावर देशाची जबाबदारी असते”.
सचिनने खेळत असताना प्रतिस्पर्ध्यांनादेखील आपल्या मैत्रीच्या नात्यात बांधले आहे . सचिनचा नावाजलेला प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नच्या गोलंदाजीला अनेक वेळा सडेतोड उत्तर दिले आहे. शेन वॉर्न स्वतः सांगतो की सचिन हा माझ्यासाठी अतिशय धोकादायक खेळाडू आहे. तरीही एक खेळाडू म्हणून, माणूस म्हणून यांचे मैत्री संबंध खूप चांगले आहेत . सचिन आणि युवराजची मैत्री तर जगजाहीर. आज युवराज आपल्या समोर उत्तम खेळ खेळताना दिसतो. सचिनने त्याला प्रत्येक वेळी प्रोत्साहन देण्याचे काम केलं आहे. युवराजचा आदर्श सचिन आहे आणि तो सचिनची पूर्णपणे आदर करताना आपण नेहमीच मैदानावर पाहिलेलं आहे. युवराज सचिनचा आशीर्वाद घेतानाचे किंवा पाया पडतानाचे चित्र अनेकदा समोर आले आहे. असेच क्रिकेट जगतातील दिग्गज मंडळी सचिनच्या मित्रांच्या यादीत आहेत.
आज सचिन तरुण वर्गाचा हिरो आहे. त्याला पाहून आपली क्रिकेट पिढी घडत आहेत. सचिन कितीतरी लोकांचा आदर्श आहे पण सचिनचे आदर्श हे क्रिकेट विश्वातील अतिशय नावाजलेल नाव ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू “सर डॉन ब्रॅडमन” हे आहेत. यांना भेटण्यासाठी सचिन आणि शेन वॉर्न जात असताना दोघांच्या मनात धाकधूक चालू होती. करण त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती . त्यांच्याशी काय बोलायचं किंवा विचारायचं असे अनेक प्रश्न सचिनला पडले होते. सचिनने त्यांना एक प्रश्न विचारला “आजच्या क्रिकेटमध्ये सरासरी खेळ किती असावा?” यावर ते म्हणाले “बहुतेक ७०” सचिनने चकित होऊन विचारले “९० एवढे कमी! ” त्यावर सर डॉन ब्रॅडमन म्हणाले की ९० वर्षीय म्हाताऱ्याकडून एवढी खेळी पण वाईट नाही” त्याच उत्स्फूर्तपणे खेळ खेळण्यासाठी त्यांना तयार पाहून नवल वाटणार नाही की सचिन यांचा एवढा आदर करतो .
सचिन जरी क्रिकेटच्या जगावर राज्य करीत असला तरी त्याचे साधेपणा त्याने कोठेही हरवू दिले नाहीये. आजही तो अगदी सगळ्यांच्याप्रति विनम्रपणा, आपुलकीची भावना ठेवून वागतो. कोणालाही तो कधी कमी लेखत नाही. याचे नवीन उदाहरण म्हणजे सचिनची सासुरवाडी लोणावळ्याची आहे . सासर्यांच्या बंगल्यावर अनेक लोक काम करतात त्यातील काही मुळशी गावातील आहेत. अशा खेड्यात राहणाऱ्या कामगाराच्या मुलीच्या लग्नाला त्याने आवर्जून हजेरी लावली . नवरा-नवरीला आशीर्वाद दिले. प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहचलेल्या व्यक्तीने गरीबाच्या लग्नाला यायचं म्हणजे नवलच आहे. यातून सचिनचा सर्वांसोबतच जिव्हाळा दिसून येतो. आज लोक ५ स्टार हॉटेलमध्ये जातात किंवा सध्या हॉटेलमध्ये जातात ते आपला दर्जा/ स्टेटसचा विचार करून सूरी- काटे ,चमचा यांनी जेवण करतात पण हा आपला मास्टर ब्लास्टर हाताने जेवण करणे पसंत करतो.
सामाजिक काम करताना सचिन घरच्या जबाबदारीत कधीही कुठेही कमी पडला नाही. सचिन आईच्या खूप जवळ आहे . सचिन आईचा खूप आदर करतो . त्याचे आईवरचे प्रेम अमर्यादित आहे. सचिनचा शेवटचा सामना पाहण्यासाठी आईने यावं ही इच्छा होती . हा सामना चेन्नईला होणार होता परंतु आईच्या आजारामुळे त्यांना प्रवास शक्य नाही म्हणून बीसीसीआयकडे सामना मुंबईत घेण्याची विनंती देखील केली आणि ती मान्य पण झाली . सचिनने आईसाठी स्टेडियममध्ये योग्य जागा निवडून तिथे आईच्या विलचेअर जाण्यासाठी रॅम्प बनवण्यात स्वतः पुढाकार घेतला. आईने तब्येत बरी नसताना देखील पूर्ण सामना तिथे बसून पहिला. सामना संपल्यावर सचिन आपल्या आईकडे आला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तो म्हणतो “ती तेव्हा काही बोलली नाही पण तिचे डोळे सगळं सांगत होते.” आईच्या डोळ्यात निवृत्तीचे महत्व समजले होते. एक आई तेव्हाच जास्त आनंदी होते जेव्हा तिचे मुलं आनंदी होतात.
भारताने सचिनला “भारत रत्न” हा पुरस्कार दिला . हा पुरस्कार त्याने आपल्या आईला समर्पित केला आहे. आई आपल्याला खूप त्याग कष्ट करून वाढवते तिचे ऋण कोणीच फेडू शकत नाही. हा पुरस्कार त्याने आपल्या आईसोबतच जगातील प्रत्येक आईला अर्पण केला आहे.
भारताने सचिनला “भारत रत्न” हा पुरस्कार दिला . हा पुरस्कार त्याने आपल्या आईला समर्पित केला आहे. आई आपल्याला खूप त्याग कष्ट करून वाढवते तिचे ऋण कोणीच फेडू शकत नाही. हा पुरस्कार त्याने आपल्या आईसोबतच जगातील प्रत्येक आईला अर्पण केला आहे.
सी एन एन- आय बी एन व हिस्ट्री 18 या दुरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रातील १०० व्यक्तीची ‘ सर्वात महान भारतीय कोण ? हा प्रश्न भारतातील जनतेसमोर मांडला होता. दूरध्वनी मोबाईल इंटरनेट आशा सर्वसामान्य माणसांनी देखील यात आपले मत मांडले होते . जनतेचा कौल, मार्केट रिसर्च व ज्युरी आशा तीन सर्वेक्षणातून पहिल्या 10 नावाच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर , ए पी जे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, जे आर डी टाटा, लता मंगेशकर, अटलबिहारी वाजपेयीं अशा दिग्गजांमध्ये सचिन तेंडुलकरकरचे नाव होते
“प्लेइंग इट माय वे” हे सचिनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित होत आहे . ३० मे ला याची प्रत वाचकांसाठी बाजारात येणार आहे. हे मास्टर ब्लास्टर सचिनचे आत्मचरित्र त्याच्या चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल यात काही शंकाच नाही. असा हा क्रिकेटचा बादशहा त्याच्या कारकिर्दीत त्याने स्वतःला सिद्ध केलेच आहे . तसच त्याने मुलगा, मित्र, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेता, समाजा प्रतीची कर्तव्य ही पूर्णपणे पार पडली आहेत. त्याने प्रसिद्धीच्या झोतात न जाता स्वतःला माणूस म्हणून जपले आहे आणि सिद्ध देखील केले आहे . आशा या क्रिकेट सम्राट “सचिन तेंडुलकर”ला माझा कोटी कोटी सलाम आहे .
“प्लेइंग इट माय वे” हे सचिनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित होत आहे . ३० मे ला याची प्रत वाचकांसाठी बाजारात येणार आहे. हे मास्टर ब्लास्टर सचिनचे आत्मचरित्र त्याच्या चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल यात काही शंकाच नाही. असा हा क्रिकेटचा बादशहा त्याच्या कारकिर्दीत त्याने स्वतःला सिद्ध केलेच आहे . तसच त्याने मुलगा, मित्र, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेता, समाजा प्रतीची कर्तव्य ही पूर्णपणे पार पडली आहेत. त्याने प्रसिद्धीच्या झोतात न जाता स्वतःला माणूस म्हणून जपले आहे आणि सिद्ध देखील केले आहे . आशा या क्रिकेट सम्राट “सचिन तेंडुलकर”ला माझा कोटी कोटी सलाम आहे .
लेखिका- रसिका कंक
( ई-मेल- [email protected] )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)
( ई-मेल- [email protected] )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)