रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ चा अंतिम सामना आज (२१ मार्च) इंडिया लिजेंड्स आणि श्रीलंका लिजेंड्स यांच्यात खेळला जाईल. तत्पूर्वी, इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर हा स्कूटीवर वेस्ट इंडिज लिजेंड्सचा कर्णधार ब्रायन लाराला रपेट मारताना दिसला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंडिया लिजेंड्स संघाने उपांत्य फेरीत लाराच्या संघाला पराभूत करून अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.
सचिन लाराचा व्हिडिओ झाला व्हायरल
सचिन आणि लारा दोघेही दुचाकी चालवताना लोकांना हेल्मेटची उपयुक्तता सांगताना दिसतायेत. स्वतः सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या बाहेर स्कूटीवर बसलेला असतो आणि त्यानंतर लारा तेथे येतो.
लारा सचिनला रपेट मारण्याविषयी विचारतो. मात्र, सचिन त्याला हेल्मेटबद्दल कोठे आहे? असा प्रश्न करतो. यावर लारा म्हणतो की, मागे बसलेल्याला हेल्मेटची काय गरज आहे? त्यावर सचिन म्हणतो की, दुचाकी चालविताना चालक आणि मागे बसलेल्या दोघांनाही हेल्मेट आवश्यक आहे.
व्हिडिओसह दिला हा संदेश
हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने कॅप्शन लिहिले की, ‘हेल्मेट घालणे फार महत्वाचे आहे. कोठेही जा, तुम्ही हेल्मेट लागणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेला हलक्यात घेऊ नका. योग्य हेल्मेट घालून नेहमी सुरक्षित रहा. ब्रायन लारा, हा संदेश पसरविण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद.’
Be it riding on the roads or driving on the ???? field, wearing a helmet is a must!
Let's not take road safety lightly & always keep safety first by wearing the right helmet.@BrianLara, thanks for helping spread this message mate. ????#RoadSafetyWorldSeries pic.twitter.com/1zoW93WdkH
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 21, 2021
या ट्विटवर इंडिया लिजेंड्सचा अष्टपैलू युवराज सिंगने एक मजेदार प्रत्युत्तर दिले. लारा आणि सचिन यांना टॅग करत युवराजने लिहिले की, ‘यासाठी तुम्हाला ऑस्कर नामांकन द्यायला हवे.’
Oscar nomination ????
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 21, 2021
आज खेळला जाणार स्पर्धेचा अंतिम सामना
नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर ही स्पर्धा संपन्न होत असून, आज स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. इंडिया लिजेंड्स विरूद्ध श्रीलंका लिजेंड्स यांच्यादरम्यान सामना खेळला जाईल. भारतीय संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरसह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, पठाण बंधू, मुनाफ पटेल, विनय कुमार या माजी भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक
विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे..! रोहितने ‘या’ गेम चेंजर खेळाडूवर उधळली स्तुतिसुमने
कोहलीच्या सलामीला फलंदाजी करण्याच्या निर्णयाने ‘हे’ खेळाडू मुकतील वर्ल्डकपला