भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना झाला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत करत ५ सामन्यांची टी२० मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. या विजयानंतर माजी भारतीय खेळाडूंनी ट्विटरवरून विजयी संघाचे कौतुक केले आहे.
दिग्गजांनी केले भारतीय संघाचे कौतुक
मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने अखेरचे दोन सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली. भारतीय संघाने अप्रतिम खेळाचा नमुना सादर करत, सर्व माजी खेळाडू व समीक्षकांची मने जिंकली.
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ट्विट करत लिहिले, ‘कसोटी सामन्यांप्रमाणेच भारतीय संघाने १-० अशा पिछाडीवरून पुनरागमन केले. एकदम अष्टपैलू कामगिरी. सुर्यकुमारची नेत्रदीपक फलंदाजी व भुवनेश्वरने केलेले सुरेख पुनरागमन पाहण्यात मजा आली. वेल डन टीम इंडिया’
Like the Test series, great fightback by India to win the series after being 1-0 down. Complete all round effort. But enjoyed watching Surya Kumar Yadav Bat and Bhuvi's comeback was spectacular. Well done Team India#INDvENG pic.twitter.com/3QSrRr8CwV
— Virender Sehwag (@virendersehwag) March 20, 2021
भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही भारतीय संघाचे मालिका विजयाबद्दल अभिनंदन केले. त्याने ट्विट करत म्हटले, ‘एकदम अप्रतिम. प्रत्येक सामना हा रोलर कोस्टरप्रमाणे होता. दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला. मालिका विजयाबद्दल अभिनंदन.’
Absolutely Terrific!
Every game has been a roller coaster & both the teams fought it out really well.
Well done #TeamIndia 🇮🇳 on the series victory! 👏🏻#INDvENG pic.twitter.com/64q6vP5vit
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 20, 2021
मागील वर्षी निवृत्त झालेला भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने देखील ट्विटरवरुन प्रतिक्रिया देत विजय संघाचे कौतुक केले. रैनाने लिहिले, ‘भारतीय संघाचा एक महान विजय. संपूर्ण मालिकेत तुम्ही शानदार खेळ दाखवला. मालिका विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. जय हिंद. भुवनेश्वर कुमार खूप सुंदर.’
What a GREAT win Team India😎 You boys put up a great show throughout the series💪 Big congratulations on the series win. Way to go. Jai Hind 🇮🇳 #INDvENG @BhuviOfficial you beauty ❤️✅🙌 @BCCI pic.twitter.com/z8HehwtdoO
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 20, 2021
याव्यतिरिक्त अनेक दिग्गज खेळाडू व समीक्षकांनी देखील भारतीय संघाचे या विजयाबद्दल अभिनंदन केले.
In a high scoring game and on a batting paradise to give away just 16 runs in 4 overs and picking 2 wkts including the dangerous Jos Butler is just a phenomenal performance. @BhuviOfficial is well and truly back💪💪 #INDvENG
— VVS Laxman (@VVSLaxman281) March 20, 2021
India have adapted brilliantly in this series … the better team have won … Add @Jaspritbumrah93 & @imjadeja to this team in Indian conditions & they are favourites to win the T20 World Cup … Great series to watch .. #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 20, 2021
उभय संघांमध्ये २३ मार्चपासून वनडे मालिका खेळवली जाईल. मालिकेतील सर्व सामने पुणे येथील महाराष्ट्रर क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर खेळविले जातील.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट जेथे विक्रम तेथे! नाबाद ८० धावांची खेळी करत विराटने केली रोहितच्या या विश्वविक्रमाची बरोबरी
मजबूत जोड! विराट-रोहितची सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी
भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच आला ‘असा’ अजब योगायोग, दोन शहरात खेळले दोन भारतीय संघ