भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या चार सामन्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली. या सामन्यात उत्कृष्ट नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेचे खूप कौतुक करण्यात आले. त्याच्याबरोबर दुसर्या सामन्याच्या विजयानंतर विराट कोहली आणि महान खेळाडू सचिन तेंडुलकरने यांनी संघाचे अभिनंदन केले.
एॅडलेड येथे निराशाजनक पराभवाला मागे सोडून येत, भारताने दुसर्या कसोटी सामन्यात दमदार प्रदर्शन केले. भारतीय संघाने 0-1 या पिछाडीवरून पुनरागमन करताना ऑस्ट्रेलिया संघाला 8 विकेट्सने लोळवले. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत ऑस्ट्रेलिया सोबत बरोबरी केली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची धुरा सांभाळताना शतकी खेळी करत भारतीय संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. त्याचबरोबर पहिल्या दिवसापासून भारतीय संघाने या सामन्यात दबदबा निर्माण केला आणि विजय प्राप्त केला.
सचिन तेंडुलकरने केले संघाचे अभिनंदन
या विजयानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे अभिनंदन करताना म्हणाले, “विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्या शिवाय विजय मिळविणे एक खूप मोठे यश आहे. संघाने मागील सामन्यात झालेला पराभव मागे सोडत, मालिका बरोबरी करण्यासाठी मेहनत घेतली हे खूपच चांगले आहे.”
To win a Test match without Virat, Rohit, Ishant & Shami is a terrific achievement.
Loved the resilience and character shown by the team to put behind the loss in the 1st Test and level the series.
Brilliant win.
Well done TEAM INDIA! ???????? #AUSvIND pic.twitter.com/64A8Xes8NF— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 29, 2020
विजयानंतर विराट कोहली झाला खुश
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा पालकत्व रजेवर मायदेशी आहे. त्यामुळे सध्या तो भारतीय संघाचा भाग नाही. परंतु भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यात मिळविलेल्या विजयाबद्दल त्याने भारतीय संघाचे स्वागत केले. विराट कोहली ट्विटरद्वारे अभिनंदन करताना म्हणाला, “हा शानदार विजय आहे. संपूर्ण संघाचा चांगला प्रयत्न होता. सोबतच्या खेळाडूंसाठी आणि अजिंक्य रहाणेसाठी याच्यापेक्षा जास्त खूश नाही होवू शकत, ज्याने विजयात संघाचे दमदार नेतृत्व केले, इथून पुढे जावे.”
What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn't be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here ????????????
— Virat Kohli (@imVkohli) December 29, 2020
रोहित शर्माने केले भारतीय संघाचे अभिनंदन
भारतीय संघाचा प्रमुख सलामी फलंदाज सध्या ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनमध्ये आहे. त्यामुळे तो दुसर्या कसोटी सामन्यात सहभागी होवू शकला नाही. परंतु भारतीय संघाचे विजयानंतर त्याने भारतीय संघाचे अभिनंदन करताना ट्विट केले आहे. तो ट्विट करताना म्हणाला,” मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय संघाचा शानदार विजय. सामन्यात संतुलन बघणे चांगले होते.”
Fantastic win for the Team India at the MCG. Character and composure shown throughout the game was excellent to watch @bcci
— Rohit Sharma (@ImRo45) December 29, 2020
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत






