भारतीय क्रिकेटमधील दोन अढळ तारे सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर. संपूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला आणि संबंध क्रिकेट विश्वाला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहेत अशी ही व्यक्तिमत्व. सध्याची पिढी विराट कोहलीला आदर्श मानते. तसाच विराट हा सचिन तेंडुलकरना आणि सचिन, गावसकर यांना आपला आदर्श मानत. आज आपण सचिन तेंडुलकर आणि महान सुनील गावसकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
१) सचिन लहानपणापासून सुनील गावसकर यांना आपला आदर्श मानत. तो अनेकदा गावसकरांसारखी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत. ज्यावेळी सचिन पहिल्यांदा भारतीय संघासाठी खेळला त्यावेळी अनेकांचे असे म्हणणे होते की, सचिनच्या खेळात गावसकरांची झलक दिसते.
२) १९८७ साली सचिनला सुनील गावसकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहिले होते. त्या वर्षीचा मुंबई क्रिकेट संघटनेचा ‘सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू’ हा पुरस्कार सचिनला मिळू शकला नव्हता. त्याबद्दल सांत्वनपर हे पत्र होते.
त्यामध्ये गावसकरांनी लिहिले होते, “तू पूर्ण हंगामात छान खेळ आहेस. पुरस्कार महत्वाचे नसतात तू असाच मन लावून आणि इमानदारीने खेळ. सोबतच अभ्यास सुद्धा कर. पुढे विदेशात गेल्यावर त्याचा फायदा होतो.”
३) १९८७ च्या मुंबईमधील शालेय स्तरावरील ‘ हॅरिस शील्ड’ या स्पर्धेचा अंतिम सामना पहायला, गावसकर हजर होते. तेव्हा सचिन आपल्या शारदाश्रम या शाळेकडून खेळत होता.
‘हॅरिस शील्ड’ ही तीच स्पर्धा आहे ज्याद्वारे सचिन तेंडुलकर हे नाव जगाला माहित झाले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी या स्पर्धेत शारदाश्रम शाळेकडून खेळताना ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती.
४) ‘हॅरिस शील्ड’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर हा सुनील गावसकर यांचे पॅड घालून खेळला होता. सुनील गावसकर यांचा भाचा हेमंत केंकरे हा देखील शारदाश्रम शाळेचा खेळाडू होता आणि त्याने सचिन अजून चांगला खेळावा म्हणून ते पॅड सचिनला घालायला दिले होते.
५) सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर यांच्यासमवेत ड्रेसिंग रूम शेअर करण्या बाबतीत कमनशिबी ठरला. १९८७-८८ मध्ये सचिनचा पहिल्यांदा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला होता. त्याच्या दोन महिने आधीच गावस्कर यांनी घरगुती क्रिकेटला रामराम ठोकला होता.
त्यानंतर, सचिन तेंडुलकरने आपल्या रणजी पदार्पणातच शतक साजरे केले होते.
६) सुनील गावसकर यांची ३४ शतके ही सचिनसाठी एक मोठी गोष्ट होती. या शतकांमुळे सचिनला खूप जास्त प्रेरणा मिळाली असल्याचे सचिनने सांगितले होते.
६) २००५ साली, गावसकर यांच्यानंतर १०,००० कसोटी धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याचा मान सचिनने मिळवला. पुढे, त्याचवर्षी सचिनने गावसकरांचा ३४ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.
सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ शतके झळकावली तर १५.९२१ धावांचा डोंगर उभारला.
७) सचिन अजूनही गावसकर यांच्यासमवेत खेळता न आल्याचे दुःख असल्याचे जाहीरपणे कबूल करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आजवर कुणालाही न जमलेला विक्रम बुमराहच्या पदरी! वाचून गर्वाने फुगेल तुमचीही छाती
‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा
बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरेलल्या विराटने क्षेत्ररक्षण करताना लुटली मैफील, पाहा भन्नाट व्हिडिओ