---Advertisement---

सचिन, स्टीव्ह वॉने साजरा केला भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटरचा १००वा वाढदिवस; पहा व्हिडिओ…

---Advertisement---

आपण क्रिकेट जगतात क्रिकेटपटू आपल्यापेक्षा लहान-मोठ्या सहकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करताना पाहिले आहे. अशाचप्रकारचा वाढदिवस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) साजरा केला आहे.

रणजी क्रिकेटपटूंपैकी सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे वसंत रायजी (Vasant Raiji) यांचा 26 जानेवारी 1920 रोजी रायजी यांचा जन्म झाला होता. त्यांचा आज 100वा (100th Birthday) वाढदिवस आहे.

त्यामुळे रायजी यांचा वाढदिवस करण्यासाठी सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Smith) उपस्थित होते. सचिनने रायजी यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन आणि स्टीव्ह वॉ रायजी यांचा 100वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

सचिनने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, “वसंत रायजी तुम्हाला या 100व्या विशेष वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. स्टीव्ह आणि मला तुमच्याकडून भूतकाळातील क्रिकेटमधील मजेदार गोष्टी ऐकूण खूप छान वाटले. आमच्या लाडक्या खेळाविषयीच्या आठवणींचा खजिना दिल्याबद्दल धन्यवाद.”

रायजी यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त सचिन आणि वॉ या दोन दिग्गज खेळाडूंनी रायजी यांच्या दक्षिण मुंबईमध्ये असणाऱ्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

त्याचबरोबर आयसीसीनेही (ICC) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रायजी यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये आयसीसीने लिहिले की, भारताचे प्रथम श्रेणीचे वयस्कर क्रिकेटपटू आज 100 वर्षांचे झाले! माजी रणजीपटू व क्रिकेट इतिहासकार वसंत रायजी यांचे एक खास शतक.

100 वर्षांच्या रायजी यांनी 40च्या दशकात 9 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. त्यामध्ये त्यांनी 23.08च्या सरासरीने 277 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या 68 सर्वाधिक धावा आहेत

वसंत रायजी हे क्रिकेटपटूबरोबरच एक इतिहासकारदेखील आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---