मुंबई आणि हैदराबाद यांच्यात मंगळवारी (३ नोव्हेंबर) रोजी झालेल्या सामन्यात चाहत्यांना काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग पाहायला मिळाला. मुंबईच्या वरच्या फळीतील फलंदाजांच्या हारकिरीनतंर फलंदाजीला उतरलेल्या धवल कुलकर्णीच्या हेल्मेटवर हैदराबादचा वेगवान गोलंदाजाने टाकलेला चेंडू जोरात आपटला आणि धवल खाली कोसळला. हा प्रसंग पाहताना लाखो ऑनलाईन प्रेक्षकांना सचिनने एक दिवसापूर्वीच धोक्याचा इशारा म्हणून केलेल्या त्या ट्विटचीही आठवण झाली.
आयपीएलच्या १३ व्या हंगामातील साखळी फेरीतील अंतिम सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) मुंबई आणि हैदराबाद या उभय संघात चांगलाच रंगला. या सामन्यात मुंबईकडून अंतिम ११ जणांमध्ये धवल कुलकर्णीला संधी देण्यात आली होती.
सचिनने सर्व क्रिकेट बोर्डांना केली विनंती
काही दिवसांपुर्वी किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा ४३वा सामना झाला होता. त्या सामन्यात हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरसोबतही हीच घटना घडली होती. त्यानंतर माजी भारतीय फलंदाज सचिनने ट्विट करत आयसीसीला सामन्यादरम्यान फलंदाजांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याची विनंती केली.
आपल्या अधिकृत अकाउंटवर सचिनने यासंदर्भात ट्विट करत लिहिले की, “वेळेनुसार क्रिकेटला गती येत आहे पण क्रिकेटपटूंच्या सुरक्षिततेचे काय? नुकतीच आपण एक चित्तथरारक घटना पाहिली आहे, जी खूप खतरनाक ठरु शकली असती. म्हणून माझी आयसीसीला कळकळीची विनंती आहे की, त्यांनी फलंदाजांना सामन्यादरम्यान हेल्मेट अनिवार्य करावे. मग तो फलंदाज फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज कुणाविरुद्धही खेळत असो.”
.@BCCI @CricketAus @ECB_cricket @OfficialCSA @BLACKCAPS @OfficialSLC @BCBtigers @TheRealPCB @windiescricket @ZimCricketv @Irelandcricket @ACBofficials @KNCBcricket
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020
आयसीसीसह सचिनने बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड अशा जवळपास सर्व मोठ्या क्रिकेट बोर्डांना टॅग केले होते. थोडक्यात सांगायचे झाले तर, सचिनने सर्व क्रिकेट बोर्डांना या प्रकरणाला गांभिर्याने घेण्याची विनंती केली आहे.
धवलच्या हेल्मटवर चेंडू लागल्यानंतर सचिनने ट्वीट केले. त्याने ट्वीट करत म्हटले की, “हेल्मेट का अनिवार्य केले पाहिजे, याचे आणखी एक उदाहरण. बरं झालं माझा मित्र धवल कुलकर्णीने हेल्मेट घातले होते.”
Another example of why helmets need to be made mandatory.
Thank God my friend @dhawal_kulkarni was wearing one.@BoriaMajumdar https://t.co/3ZRv8fGLKe— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020
धवल कुलकर्णीची आयपीएल आकडेवारी
महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याचा मुंबई-हैदराबाद सामना आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २२ धावा दिल्या. दरम्यान तो एकही विकेट घेऊ शकला नाही. तर फलंदाजी करताना त्याने ३ धावा केल्या.
जर धवल कुलकर्णीच्या संपूर्ण आयपीएल आकडेवारीला पाहायचे झाले तर, त्याने आतापर्यंत एकूण ९१ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १६ धावांवर ४ विकेट्सच्या सर्वोत्तम कामगिरीसह ८६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटपेक्षा खेळाडूचा जीव महत्त्वाचा; ‘त्या’ चित्तथरारक घटनेनंतर सचिनची आयसीसीला मोठी विनंती
ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम
सूर्यकुमार यादवच्या ‘या’ पराक्रमाने तरी निवड समितीचे डोळे उघडतील का?
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे