---Advertisement---

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची खराब अवस्था बदलणार का? आतापर्यंत अपयशच

On: शुक्रवार, एप्रिल 11, 2025 6:27 PM
CSK Team
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामना गमावल्यानंतर पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्समध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, आम्ही आमच्या घरेलू मैदानावर फायदा घेऊ शकत नाही आहोत. हे वक्तव्य चेन्नई सुपर किंग्स संघाचे हंगामातील प्रदर्शन सांगत आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने पाच सामन्यांमधील चार सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये सुद्धा संघ नव्या स्थानावर आहे. फक्त घरच्या मैदानावरच नाही तर संघ संयोजनापासून ते पॉवरप्ले मधील प्रदर्शन असेच काही अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे शोधण्यास चेन्नई असमर्थ राहिली आहे.

एक वेळ होती ज्यावेळी चेन्नईच्या चेपॉक मैदानाला चेन्नई सुपर किंग्स संघाचा किल्ला समजला जायचा. या हंगामात तो किल्ला हळूहळू उध्वस्त होताना दिसत आहे, असे यामुळे कारण चेन्नईने 5 सामन्यांमधील त्यांचे 3 सामने चेपोकच्या मैदानावर खेळले आहेत. यामध्ये दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या मैदानावर चेन्नईला बंगळुरूने 17 वर्षानंतर हरवले. तसेच दिल्ली कॅपिटल्सने 15 वर्षानंतर चेपॉकमध्ये चेन्नईचा पराभव केला.

मागच्या वर्षात चेपॉक विकेटमध्ये खूप बदल पाहायला मिळालेला आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सुद्धा हे मानतो की, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही वेळेस पावरप्ले चेन्नईसाठी समस्या आहे. 2021 आणि 2023 मध्ये चॅम्पियन बनलेली चेन्नई सुपर किंग्स 2018 पासून 180 धावांपेक्षा जास्त धावसंख्या आव्हान पार करू शकली नाही. चेन्नईने कायमच गोलंदाजीमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांना अडकवून सामने जिंकले आहेत, पण आता हे पारडं उलट फिरताना दिसत आहे.

चेन्नई त्यांचे 5 सामन्यांमधील 4 सामने गमावून संघर्ष करत आहे. चेन्नईकडे त्यांचा थाला म्हणजेच एम एस धोनी पुन्हा कर्णधार पदावर विराजमान झाला आहे. धोनी फलंदाज म्हणून स्वतः 5 नंबर वर खेळण्यासाठी येत आहे, जिथे त्याने लांब शॉट सुद्धा लावले आहेत. आता धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई पुनरागमन करेल का? धोनीच्या नेतृत्वात नवीन गोलंदाजांना स्थान मिळेल का, की पुन्हा चेन्नईला त्याच पराभवाला सामोरे जावे लागेल? हे प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्याची उत्तरे आपल्याला लवकरात लवकरच मिळतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---