भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू कार आणि बाईक्सचे दिवाने आहेत. अनेकांकडे महागड्या कार आणि बाईक्स आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचाही समावेश आहे. भारताचा महान फलंदाज सचिनचे कारप्रती असणारे प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. त्याच्याकडे अनेक महागड्या कार उपलब्ध आहेत.
सचिनने त्याला क्रिकेटमधून मिळालेल्या पैशातून मारोती-८०० ही पहिली कार विकत घेतली होती. सचिनने भारतीय टेबल टेनिसपटू मुदित दानी याच्याशी ‘इन द स्पोर्टलाईट’ शोमध्ये बोलताना आपल्या पहिल्या कारप्रती असणाऱ्या भावनांचा खुलासा केला आहे. दरम्यान बोलताना त्याने ज्या व्यक्तीने ती कार विकत घेतली होती, त्याला आपल्याशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे. Sachin Tendulkar Asks For His First Car Maroti 800
सचिन बोलताना म्हणाला की, “माझी पहिली कार मारोती-८०० ही होती. दुर्दैवाने ती कार आता माझ्याजवळ नाही. माझी पहिली कार मला परत मिळाली तर मला खूप चांगले वाटेल. जेवढे लोक मला ऐकत आहेत, त्यापैकी कुणाला कारविषयी काही माहिती असेल. तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. माझ्या घराजवळ एक मोठा ओपन-ड्राइव्ह-इन मुव्ही हॉल होता. तिथे लोक आपापली कार पार्क करुन चित्रपट पाहात असायचे. त्यावेळी मी माझ्या भावासोबत बालकनीमध्ये तास-न-तास उभा राहून तेथील कारला बघत असायचो.”
तसेच बोलताना सचिनने त्याचे आदर्श भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. सचिन म्हणाला की, “एकदा मी ड्रेसिंग रुमच्या पुढे उभा होतो. कारण मला पाहायचे होते की, खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी कशाप्रकारे तयार होतात. त्यावेळी मला ड्रेसिंग रुममध्ये असलेले माझे हिरो सुनिल गावसकर दिसले होते. मला अजूनही आठवत आहे की, ते एका कोपऱ्यात शेवटच्या सीटवर बसले होते. योगायोगाने मी रणजी ट्रॉफी खेळायला सुरुवात केल्यानंतर त्याच सीटवर जाऊन बसलो होतो. तो खूप शानदार योगायोग होता.”
सचिनला जगातील महान फलंदाजांमध्ये गणले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. शिवाय, सचिनने कसोटीत ५१ आणि वनडेत ४९ शतके मारत पूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १०० शतके मारण्याचा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
२०११ विश्वचषकातील धोनीचा विजयी षटकार ज्या ठिकाणी पडला होता, ती सीट होणार धोनीच्या नावावर?
सीपीएलच्या पहिल्याच सामन्यात सुनील नारायणचा जलवा; अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला संघाला विजय
पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघ सज्ज; या १४ खेळांडूंची झाली संघात निवड
ट्रेंडिंग लेख –
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा
या ४ अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते एमएस धोनीचे नाव