भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर केवळ एक दिग्गज खेळाडू नसून तो एक प्रामाणिक व्यक्तीसुद्धा आहे.
त्याच्या या प्रामाणिकतेमुळे त्याचा अवघ्या जगभरातून खूप आदर केला जातो. असे असले तरीही बॅट बनविणारी ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टनने सचिनची फसवणूक केली आहे.
स्पार्टनने आता आपली चुक केल्याचे वृत्त आहे.
माध्यमांतील काही वृत्तांनुुसार, सचिनने (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियाच्या फेडरल कोर्टात (न्यायालय) स्पार्टन कंपनीबरोबर सुरु असलेला कायदेशीर खटला जिंकला आहे.
सचिनने २०१६मध्ये स्पार्टन कंपनीच्या वस्तूंचे प्रमोशन करण्यासाठी करार केला होता. तरी यानंतर सचिनने कंपनीवर आरोप लावले की, त्यांनी करारात असणाऱ्या नियमांचे पालन केले नाही. तसेच स्पार्टनने सचिनला कराराअंतर्गत निश्चित केलेले रॉयल्टी आणि एंडॉर्समेंट शुल्कदेखील दिले नाही.
इतकेच नव्हे तर स्पार्टन कंपनीने (Spartan Company) करार रद्द संपल्यानंतरही सचिनच्या नावाचा वापर केला. यादरम्यान सचिनने स्पार्टनसाठी मुंबई आणि लंडनमध्ये अनेक प्रमोशनल कार्यक्रमदेखील केले. त्यामुळे त्याला खेळाच्या वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांबरोबर करार करत आला नाही.
आता सचिन आणि स्पार्टनमधील प्रकरणाचा निकाल लागला आहे. स्पार्टन कंपनीने आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप कबूल केले आहेत. स्पार्टनला कोर्टाच्या आदेशांचे पालन करण्याचे सांगितले आहे. ज्यामध्ये सचिनचे नाव, फोटो आणि चूकीचे एंडॉर्समेंट न करण्याचा समावेश आहे. तसेच स्पार्टन कंपनीने सचिनचा फोटो असलेला ट्रेडमार्कदेखील रद्द केले आहे.
स्पाँसरशीप कराराचे उल्लंंघन केल्याबद्दल स्पार्टन कंपनीने सचिनची माफी मागितली आहे. स्पार्टन कंपनीने सार्वजनिकरित्या हे कबूल केले की, त्यांनी सचिनबरोबर १७ डिसेंबर २०१८नंतर कोणताच करार केलेला नाही.
याबाबत सचिनची व्यवस्थापन कंपनी एसआरटी स्पोर्ट्सचे अधिकारी मृण्मोय मुखर्जीने म्हटले की, हे प्रकरण संपल्यामुळे सचिनला खूप आनंद झाला आहे.