भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा निवृत्तीच्या 10 वर्षानंतरही प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्याच्या याच प्रसिद्धीचा फायदा करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सचिन आता निवडणूक आयोगाचा ब्रॅंड ऍम्बेसिडर बनला असून, तो आयोगासह देशातील नागरिकांना मतदानासाठी जागरूक करेल. सचिन याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा देखील मिळालेला आहे.
निवडणूक आयोगाने मंगळवारी (22 ऑगस्ट) याबाबतची घोषणा केली. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वातील मान्यवर खेळाडू असल्याने तसेच देशभरात त्याला सन्मान दिला जात असल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले. सचिन यापूर्वी देखील अनेक शासकीय योजनांचा ब्रँड ऍंबेसिडर म्हणून काम करत आला आहे. याव्यतिरिक्त तो तब्बल सहा वर्ष राज्यसभेचा खासदार देखील होता.
(Sachin Tendulkar Become Election Commision Brand Ambassador)
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री






