भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणार्या चार सामन्याची कसोटी मालिकेची सर्वाना प्रतीक्षा लागून राहिली आहे. भारतीय संघाने मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत हरवले होते. परंतु यंदा भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे बंदीनंतर पुन्हा संघात सामील झाले आहेत. त्यामुळे वॉर्नर, स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने हे भारतासाठी धोकादायक ठरू शकतात, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
सचिन म्हणाला,”ऑस्ट्रेलिया जेव्हा मागील वेळेस भारतासोबत खेळला होता, त्यानंतर संघात तीन महत्त्वपूर्ण खेळाडू आले आहेत. आता त्यांच्या संघात वॉर्नर, स्मिथ आणि लॅब्यूशाने आहेत. त्यामुळे मागील वेळेपेक्षा आता ऑस्ट्रेलिया संघ मजबूत आहे. जेव्हा तुमच्या संघात वरीष्ठ खेळाडू नसतात, तेव्हा ती पोकळी जाणवते,आणि ऑस्ट्रेलिया संघाने ते अनुभवले आहे.”
मागील वेळेस भारतीय संघाने जेव्हा ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, तेव्हा स्मिथ आणि वॉर्नर संघात नव्हते. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार ठरला होता. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केपटाऊनमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
दोन्ही देशात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यापैकी पहिला सामना 17 डिसेंबरला ऍडलेड येथे खेळला जाईल. हा सामना दिवस- रात्र खेळला जाणार आहे आणि भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात गुलाबी चेंडूने खेळणार आहे. दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळला जाईल. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी, चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 15 जानेवारीला सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
“इशांत शर्माची ‘ही’ खासियत, म्हणूनच भारतीय संघ त्याला शंभर टक्के मिस करेल”
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
दुःखद! ‘या’ महान क्रिकेटपटूला झाला पितृशोक, आजारपणामुळे वडिलांचे निधन